डफळापूर | चेअरमन बाबासाहेब माळी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा |

0
27

डफळापूर,वार्ताहर: श्री.दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब बाळु माळी यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी येथील जनावराचा दवाखाना परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा 1 व 2,माळी वस्ती शाळा,व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला.तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांचा वाढदिवस कधीही साजरा न केला जात नव्हता.मात्र तालुक्यातील अर्थकरणातील बडे बस्त म्हणून ते परिचित झाले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांना माननारा मोठा वर्ग आहे.त्यांचे प्रत्येक काम महत्वाचे ठरते.तसाचं 25 जून हा त्यांचा वाढदिवसही ठरला.अगदी दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.मोबाईल, वॉटस्अप, फेसबुकच्या माध्यमातून त्यांना दिवसभर शुभेच्छा देण्यात येत होत्या. त्यांचा मित्रपरिवार,दत्त, सिध्दिविनायक या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. येथील जनावरांच्या दवाखान्यात वृक्षारोपन करण्यात आले,तसेच जिल्हा परिषद मराठी मुलां-मुलींच्या शाळा,अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना लाडु वाटप करण्यात आले. तेथेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी दत्त पतसंस्थेचे व्हा.चेअरमन गणेश वठारे,वरदविनायक पतसंस्थेचे चेअरमन सचिन माळी,व्हा.चेअरमन रमेशराव गायकवाड,युवराज यादव,

संचालक अशोक सवदे, महेश दुगाणे,दादा माळी,तानाजी पवार,संस्थेचे सचिव राजेंद्र पोतदार,संतोष बंडगर,हणमंत कोळी,संजय सुर्यवंशी,चेअरमन फांऊडेशन,दत्त दुध संकलन केंद्र,जिरग्याळ,श्री दत्त,श्री सिध्दिविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने नियोजन करण्यात आले.

डफळापूर, दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन व जि.प.शाळातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here