संख,वार्ताहर: शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.आर.के.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संख या नुतन महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा ज्ञानयोगाश्रम विजापूर मठाचे परम पुज्य श्री.सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात बुधवार ता.25 जुलैला सकाळी 11.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार संजय पाटील, आ.विलासराव जगताप,प.पू.श्री.मुरघेंद्र महास्वामीजी, प.पू.श्री.अमृत्तानंद महास्वामीजी, प.पू.अात्मानंद महास्वामीजी,प्रसिध्द डॉ.रविंद्र आरळी,सभापती सौ.मंगलताई जमदाडे,संजय परमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
जत तालुक्यातील विस्तारच्या विचार करता संख येथे उच्च महाविद्यालयाची मागणी होती. पुर्व भागातील विद्यार्थींना जत येथे एकमेव असलेल्या महाविद्यालय येथे शिक्षणासाठी यावे लागत होते.जतच्या शेवटच्या टोकापासून हे अंतर 70 किलोमीटर आहे.त्यामुळे गैरसोय होत होती. अनेक मुले, मुलींना लांब अंतरामुळे शिक्षण बंद करावे लागले होते.त्यांची दखल घेत शासनाने संख येथे महाविद्यालयास परवानगी दिली आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सलग्निंत हे महाविद्यालय चालणार आहे. त्यांचा उद्घाटन सोहळा बुधवारी होत अाहे.या कार्यक्रमाचा परिसरातील विद्यार्थी,पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.गुरूबसव विद्यामंदिर व ज्यू कॉलेज संख येथे हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संख: नव्याने सुरू होत असलेल्या आर.के. पाटील महाविद्यालयाचा परिसर