जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शासकीय कार्यालय प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहे.ती भरावीत या मागणीसाठी युवक नेते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखालील येथील तहसील कार्यालयासमोर घटानांद अंदोलन करण्यात आले.आरळी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्तंभाला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयापर्यत अंदोलक रॅलीने आले.शासन धोरणाचा निषेध करत तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी करत घटानांद करण्यात आला.अंदोलनास जि.प.सरदार पाटील, माजी सदस्य कुंडलिक दुधाळ,भाजपचे सर्व नगरसेवक,रासप जत कडून पांठिबा देण्यात आला.रासपचे अनेक नेते अंदोलनात सहभागी झाले होते.त्याशिवाय गौतम ऐवळे,आण्णासो टेंगले,किसन टेंगले,विठ्ठल पुजारी, पांडूरंग धडस,रवी कित्तुरे,राजाराम घुटूगडे,कुमार काळे,गणेश शेजाळ,सुनिल शेजाळ,रमेश कोळेकर,कॉम्रेड अर्जून कुकडे,नियाज जमादार यांनी अंदोलनात सहभागी होत पांठिबा दिला.मोठ्या संख्येने यात नागरिक सहभागी झाले होते.मागण्याचे निवेदन तहसिलदार अभिजित पाटील यांना देण्यात आले.
विक्रम ढोणे म्हणाले, जत तालुक्यातील जनतेनी सत्ताधारी भाजपला तीन वेळा आमदार निवडून दिला,लोकसभा निवडणूकीत मोठे मताधिक्य दिले.जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने भाजपला सत्तेत आणले आहे.तरीही जनतेशी निगडीत असलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे या सरकारने अनेक वर्षापासून भरली नाहीत.त्यामुळे जनतेला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.अन्य विकास कामाबरोबर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी महत्वाचे आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधीनी ही पदे भरण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील महत्वाचे शहर असणाऱ्या जत पालिकेला गेल्या वर्षभरापासून पुर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहर मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. कायदासुव्यस्था आबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ पद असणारे डिवायएसपी पदांचा कार्यभार अतिरिक्त साठ किलोमीटर वरील अधिकाऱ्याकडे आहे.एकादी मोठी घटना घडली तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते.त्यावेळी दुय्यम अधिकाऱ्यावर मोठा भार पडतो.महसूल सारख्या महत्वाच्या कार्यालयातील नायब तहसिलदार, विभाग प्रमुख पदे रिक्त आहेत.ग्रामपंचायतीचे शिखर खाते असणाऱ्या पंचायत समितीला गेली दीड वर्ष पुर्ण वेळी गटविकास अधिकारी नाहीत.तेथील अनेक विभागाचे प्रमुख तब्बल तिन वर्षापासून रिक्त आहेत. दुय्यम अधिकारीं कार्यभार बघत असल्याने कामांना मर्यादा पडत आहेत. शिक्षकांची मोठी पदे अनेक वर्षापासून रिक्त असल्याने तालुक्यातील नव्या पिढीच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शाळा विना शिक्षक आहे.काही शाळा एकच शिक्षक चालवित आहेत.याशिवाय बांधकाम विभाग,जलसंपदा विभागातील अभियंता पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय योजनाचा बोजवारा उडाला आहे.शासनाचे याकडे लक्ष वेधावे,मोठा विश्वास ठेवून भाजप शासित सत्ताधाऱ्यांना सत्ता देऊनही त्यांनी केलेल्या अपेक्षा भंगला या घटानांद मुळे जाग यावी व शासकीय कार्यालयातील रिक्त जागा तातडीने भराव्यात यासाठी हे अंदोलन करण्यात आले आहे.यापुढे शासनाने दखल न घेतल्यास वेगळ्या स्वरूपाचे अंदोलन करण्याचा इशारा यावेळी ढोणे यांनी दिला.
जत तालुक्यातील रिक्त पदे भरावीत या मागणीसाठी विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखालील घटानांद अंदोलन करण्यात आले.





