जत तालुक्यात सततच्या रिमझिमने शेती कामे खोळंबली: खड्डेयुक्त रस्त्याने दैना
जत,वार्ताहर : जत शहर व परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जत तालुक्यातील सर्वच गावात पुन्हा दलदल निर्माण होऊन रस्ते राडेराड झाले असून, जत शहरही चिखलमय झाले आहे.
जत शहरात दुपारपासून पावसास सुरुवात झाली.द दिवसभरात जनजिनव विस्कळीत झाले. जत तालुक्यातील डफळापूर,शेगाव,कुंभारी,संख,मा
जत तालुक्यात परतीच्या पाऊसावर रब्बीचा हंगाम ठरतो. त्यामुळे परतीचे अजून मोठे पाऊस होणे गरजेचे आहे.दरम्यान जत शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात पाऊसाचे पाणी साचून वाहन धारकाची मोठी दैना झाली.
फोटोओळी: जत शहरात शुक्रवारी पडलेल्या पाऊसाने खड्डेयुक्त रस्त्याने वाहन धारकाना कसरत करावी लागत आहे.







