जत| वृक्ष लावडीचा साधा निसर्ग नियमही पायदळी, खट्ट मानरानावर दगडे लावून वृक्ष उभे केले |

0
8

चार दिवसात वृक्षाचे जळणं

जत,प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अतर्गंत जत तालुक्यातील वन विभागाचे दिलेले टार्गेट पुर्ण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र पुढे वृक्ष लागवड सुरू असताना खट्ट दगडात लावलेले वृक्ष पाठीमागे वाळू लागले आहेत. शासनाच्या कोट्यावधीच्या निधीचा यामुळे चुराडा केला जात आहे.
वृक्ष लागवड करताना साधे मातीत वृक्ष लावायचे हा साधा निसर्ग नियमही पाळला गेला नाही.अगदी दगड-गोठे भोवती लावून दिसावेत असे वृक्ष उभे केले आहेत. पुढे मोहिम गतीने सुरू असताना मागे वाळलेले वृक्ष खरचं शासनाचा उद्देश सफल होणार का? यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे.जत तालुक्यात आतापर्यत लाखो वृक्षाची लागवड झाली आहे. त्यातिल बोटावर मोजण्याऐवढे वृक्ष जगले आहेत.निधी मात्र कोट्यावधीच्या खर्ची पडला आहे. यंदाही मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम पायदळी तुडविली जात आहे. जत तालुक्यातील वनविभागाच्या वतीने वृक्ष लावडीचा नुसता फार्स केला जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमीकडून होत आहे.

वृक्ष लागवड सप्ताहातच शेकडो वृक्षावर कुऱ्हाड
एकीकडे वृक्ष लागवडीचे आदेश पाळले जात असताना दुसरीकडे शेकडो अडसाल, फळांच्या वृक्षावर दिवसाढवळ्या कुऱ्हाड चालविली जात आहे. वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर होणाऱ्या वृक्ष तोडीला अभय कोणाचे असाही सवाल उपस्थित होत आहे. लाखोची मलई मिळविणारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बदल कधी करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जत तालुक्यातील वनविभागाच्या खट्ट माळरानांवर वतीने दगडे लावून वृक्ष लावेल जात आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here