अनेक वर्षाच्या कचऱ्यांतून मुक्ती
जत,प्रतिनिधी: जत शहरातील घाणेघाण ओढापात्रातील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन तहसीलदार तथा मुख्याधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या नविन धोरणानुसार जलयुक्त शिवार 2018-19 योजनेत शहरे समाविष्ठ करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेतून जत शहरातील प्रांरभी गंधर्व नदी,विठ्ठलनगरमधील शंभू ओढा,व शिवाजी पेठेतून वाहणारा ओढा अशा तीन ओढापात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे.अनेक वर्षापासून घाणीचे सामाज्र ही ओढापात्रे बनली आहेत.अतिक्रमणामुळे ओढ्याचे नाले झाले आहेत. त्यांचीही स्वच्छता नसल्याने घाणीचे ढिगारे ओढापात्रा साचले होते.त्यातून साडपांणी वाहून जात नसल्याने अडलेल्या पाण्याने रोगराई वाढली होती.त्यामुळे ओढे साफ करणे महत्वपुर्ण होते.जतचे तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे नगरपरीषदेचा अतिरिक्त कार्यभार आल्याने त्यांनी शहरातील स्वच्छतेकडे प्राधान्य दिले आहे. त्याचाचं भाग म्हणून त्यांच्या पुढाकाराने शहरातील ओढापात्रातील कचरा हटवून रुंदीकरणाचे काम जलयुक्त शिवार योजनेतून सुरू झाले आहे. प्रांरभी तीन ओढापात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे मागणी येईल तसे शहरातील सर्वच ओढापात्रे स्वच्छ करण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान तहसीलदार अभिजित पाटील यांनी सुरू केलेल्या या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.यावेळी विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, मंडल अधिकारी श्री.जाधव,जायभाये,नगरपरीषदेची पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषदेची निधी वाचला
शहरातील या ओढापात्रातील स्वच्छता करण्यासाठी नगरपरीषदेच्या निधी खर्च करावा लागत होेता.मात्र यावर्षी शासनाने शहराचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश केल्याचा फायदा जतला होत आहे.त्यातच तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार असल्याने त्यांच्या रेट्यामुळे शहरातील सर्व ओढे जलयुक्त शिवार योजनेतून स्वच्छ करण्यात येणार असल्याने नगरपरीषदेच्या मोठ्या निधीची बचत होणार आहे. तो निधी जनतेच्या अन्य योजनासाठी खर्च करणे शक्य होणार आहे.
जत शहरातील ओढापात्र रूंदीकरण कामाचे उद्घाटन करताना तहसीलदार अभिजित पाटील, विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत,सुरज पाटील व मान्यवर






