डफळापूर: बेंळूखी ता.जत येथे शासनाच्या झांशीची राणी योजनेअंतर्गत शालेय मुलींना जाणेयेणेसाठी तिन सायकलीचे वाटप करण्यात आले.
मुली शिकाव्यात,त्यासाठी शासनाकडून मुलींना सायकलीचे वाटप केले जात आहे. बेळूंखीतील गोंजिरा केंगार,अश्विनी अनुसे,सानिका कांबळे या तीन मुलींना ह्या सायकली देण्यात आल्या आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकात चव्हाण, मारूती माळी,शंकर केंगार,गोरख केंगार,ग्रामसेवक संगिता भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.





