18 हाजाराचा दंड वसूल : वाहन मालकावर न्यायालयात खटले
जत,प्रतिनिधी: जत,उमदी सह कवटेमंहकाळ पोलिस ठाणे हद्दीतील शाळा,महाविद्यालये सुरू होण्याअगोदर कायद्याचा धाक रहावा यासाठी निर्भया पथकाकडून कारवाया कडक करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून 25 अल्पवयीन वाहनचालकावर कारवाई करत वाहन मालकावर कोर्टात खटले दाखल केले आहेत.कारवाईत सुमारे 18 हाजार रूपयाचा दंड पथकाने वसूल केला आहे. दरम्यान निर्भया पथकाकडून मंगळवारी खाजगी वाहतूक वाहनाचे चालक-मालक,एस.टी.डेपोचे व्यवस्थापक, ड्रायव्हर,कंडक्टर,सर्व शाळाचे मुख्याध्यापक यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या.बैठकीत महिला,मुलीच्या आरक्षित आसन व्यवस्थचे नियम कडकपणे पाळाव्यात, महिला-मुलींचा छेडछाडीचा प्रकारास आळा घालावा,प्रंसगी पोलिसांना कळवावेत.एसटीतून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना होणार त्रास व छेडछाडी प्रकारांवर नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याशिवाय शाळांच्या बैठकात निर्भया पथकाचे कामकाम,महिला विषय कायदे,शाळांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच टोल फ्री नंबर 1091 व प्रतिसाद आस्क अॅप बद्दल माहिती देण्यात आली.शाळेत निर्भया पथकाची बॅनर्सचे वाटप करण्यात आले.
याशिवाय पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी बसेस, खाजगी प्रवाशी वाहतूक वाहने,अॅटोरिक्षा,यांचेवर निर्भया पथकांची माहिती, टोल फ्री.नंबर असणारे स्टिकर्स चिटकविण्यात आले.शहरातील बेजबाबदार वाहने चालविणाऱ्या शाळकरी मुलांवर यापुढे कडक कारवाईचा पहिला पाढाव सुरू झाला आहे.
जत,कवटेमंहकाळ व उमदी हद्दीतील महिला,शाळकरी मुलींना होणार त्रास,छेडछाडी,अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहने चालविणाऱ्या विरोधात नव्या कायद्याअन्वये खटले दाखल केले जात आहेत.कोणत्याही प्रकारे महिला,मुलींना संशास्पद प्रकार आढळूंन आल्यास,तातडीने टोल फ्री नंबर 1091 व प्रतिसाद (आस्क)अॅप वर तातडीने संपर्क करावा.तात्काळ पोलिस सुरक्षा मिळेल.
वर्षा डोंगरे,सा.पोलिस निरीक्षक, तथा निर्भाय पथक प्रमुख





