जत | दुकानावर दरोड्याचा प्रयत्न,सशयिंत दरोडेखोरांना दिला चोफ,तिघे गंभीर जखमी |

0
9

जत,प्रतिनिधी: जत शहरातील मध्यवर्ती भागातील निगडी कॉर्नर येथील प्रज्वल श्रीमंत साळे यांच्या मालकीचे भाग्यश्री किराणा स्टोअर्स हे दुकानावर शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला.दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहापैंकी तीन दरोडेखोरांना दुकानचे मालक व नागरिंकानी प्रंसगावधान राखत पकडून चोप दिला.त्यात दिघे चोरटे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.तिघेजण अंधराचा फायदा घेऊन फसार झाले आहेत.सिध्दार्थ दत्ता चव्हाण(वय-20),बाबू विष्णु काळे,(वय-27,दोघेही, रा.जत)वंसत रतन पवार(वय-27, रा.पुणे)असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडून कटावनी, लोंखडी रॉड, चटणी पावडर आदी साहित्य जप्त केले आहे.याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, जत शहरातील निगडीरोड येथे प्रज्वल साळे यांचे भाग्यश्री किराणा स्टोअर्स हे होलसेल व किरकोळ किराणा दुकान आहे.दुकानाच्या पाठीमागून इमारतीवर जाऊन यापुर्वी दोनवेळा पत्रे उचकटून दुकानात चोरी झाली आहे. बाजूच्या दुकानातही अनेकवेळा चोरी झाली आहे. त्यामुळे प्रज्वल हे दुकानात मुक्कामी असायचे शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास असाच प्रकार झाला पाठीमागून इमारतीवर चढून पत्रा कापण्याचा आवाज आत झोपलेल्या प्रज्वल याला आल्याने ते जागे झाले तातडीने मोबाईल द्वारे त्यांनी कुटुबिंय व मित्रांना बोलविले,मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले,तोपर्यत तिघे चोरटे इमारतीच्या छतावर पत्रे कापत होते.तेवढ्यात प्रज्वल बाहेर येताच चोरट्यानीं त्याच्या डोळ्यात चटणी टाकून गजाने हल्ला केला मात्र तो प्रज्वलने चुकवला.तोपर्यत नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले.त्यांना राखण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले दोघे पळून गेले.मात्र पकडलेल्या तिघांना पकडून नागरिंकानी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यात तिघे गंभीर जखमी झाल्याने चोरट्यांना उपचार्थ मिरज सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान तीघा सशयिंत चोरट्याकडून कटावनी, लोंखडी रॉड, चटणी पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.या कारवाईत पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार, सा.पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस हवलदार विजय वीर,बजरंग थोरात,सचिन हाक्के,आप्पासाहेब हाक्के,राजू पवार यांनी भाग घेतला

गेल्या चार महिन्यात प्रंचड चोऱ्या

जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात गेल्या चोर महिन्यात सुमारे शंभरावर चोऱ्या झाल्या आहेत.घरफोड्या,दुकानाचे स्वेटर उचकटून रोख रक्कम, पैसे लंपास केले आहेत.घरासमोर लावलेल्या दुचाकी मोठ्या संख्येने चोरीला गेल्या आहे.या चोरट्याना पकडल्याने मागील चोऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.

पोलिस वैतागले

जतसह तालुक्यातील अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात विजापूर रोडवरील बेदाण्याचा टॅम्पो चोरी सारख्या मोठ्या घटना घडल्या आहेत. पोलिसाकडून नाकाबंदी,छापामारी करूनही चोरटे हाताला लागत नव्हते.यावेळी मात्र चोरट्याचा मनसुबा धुळीस मिळाला आहे. नागरिकांनी पकडून दिलेल्या चोरट्याकडून अन्य चोरीचाही तपास लावण्याचा पोलिसाचा प्रयत्न राहिल.

फिर्यादीस दमदाटीचा प्रयत्न

शहरातील दरोड्याच्या तयारीतील नागरिकांनी पकडून दिलेल्या प्रकरणात जत शहरातील दोघाचा समावेश आहे.त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांकडून फिर्यादीला पोलिस समोर असतानाही दमदाटी करण्यात आली. आज पोलिस आहेत,उद्या तुला सोडणार नसल्याचा दम अरोपीच्या नातेवाईकांनी दिल्याचे फिर्यादी प्रज्वल साळे यांनी सांगितले.त्यामुळे निगडी कॉर्नर येथे शनिवारी रात्रीपासून स्पेशल फोर्सचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक सचिन गढवे करत आहेत.

जत,शहरातील निगडी कॉर्नर येथील दरोड्याच्या प्रयत्न झालेल्या भाग्यश्री किराणा स्टोअर्समध्ये पोलिस पंचनामा करताना,तर छतावरील पत्रा उटकटल्याने हुक निखळे आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here