डफळापूर | ज्ञानाची विक्री झाल्यास ज्ञान अपवित्र होते : आमदार विलासराव जगताप |

0
5

डफळापूर, वार्ताहर:ज्ञानापेक्षा पेक्षा कोणतेही पवित्र कार्य नाही,मात्र ज्ञानाची विक्री झाल्यास ज्ञान अपवित्र होते,असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.परशूराम चव्हाण सर यांच्या विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कुलच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब,जे.के.माळी,विलास माने,संरपच बालिका चव्हाण, उपसंरपच प्रतापराव चव्हाण,वंसत पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले,ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार व्हावेत,येथील विद्यार्थी भविष्यातील प्रशासकीय अधिकारी व्हावेत असे उच्च दर्जाचे शिक्षण विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूल मधून दिले जावे,ज्या महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी त्याग केला त्यांच्या प्रतिमा लावून आदर्श घ्यावा असे आमदार जगताप शेवटी म्हणाले,
डफळापूर परिसरातील मुलांना इग्रंजी माध्यमाचे प्रशस्त दालन यामुळे डफळापूर करांच्या सेवेत उपलब्धं झाले आहे.ग्रा.प.सदस्य विठ्ठल छत्रे,भानुदास गडदे,दत्ता माळी, संदीप पोतदार,अशोक छत्रे,प्रमोद चव्हाण,सज्जन शिंदे,राजेंद्र चव्हाण,बाजीराव पाटील माधवराव पाटील,प्रा.बी आर पाटील,हिमालय संकपाळ,चद्रकांत पवार सर,संतोष भाट आदी मान्यवर उपस्थित होते.

डफळापूर येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना आ.विलासराव जगताप

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here