जत,प्रतिनिधी:निगडी खुर्द (ता ).जत)येथील प्रकाश बयाजी चंदनशिवे (वय.55 रा.निगडी खुर्द)हे सोमवारी सकाळी 7 वाजता राहत्या घरासमोरील अंगणात झाडाला पाणी घालत असतानाच झाडाच्या वरुन गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मुत्यू झाला.
प्रकाश चंदनशिवे यांच्या घरासमोर काही दिवसापुर्वी विजेची तार तुटून झाडामध्ये आडकली होती.चंदनशिवे हे घरातील अंगणात पाणी मारत असताना विजेच्या तारेला हात लागल्याने विजेचा शाॅक लागला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निखितन आनंदा चंदनशिवे यांनी जत पोलिसात दिली आहे.घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे. पुढील तपास पोलिस हेड काॅन्सटेबल दौलत कोळी करत आहे.
फोटो :(मयत)प्रकाश बयाजी चंदनशिवे.





