जत | जिल्हा परिषद शाळेत चोरी : 50 हाजाराचा मुद्देमाल लंपास | www.sankettimes.com

0
10

जत,प्रतिनिधी: जत शहरातील शाळा न.3 येथे शाळेच्या सुट्टी काळात शाळेचा दरवाज्याचे कुलूप तोडून वर्गातील पोषण आहार शिजविण्याची भांडी,धान्याची सुमारे 50 हाजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यानीं लंपास केला आहे.तसेच शाळेचे कपाटात ठेवलेले साहित्य विस्कटून टाकले आहे. याबाबतची तक्रार जत पोलिसात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
सुट्टी काळात शाळेच ठेवलेली आहार शिजविण्याची पातेली,व अऩ्य भांडी,ताटे,गॅस सिंलेडर दोन टाक्या,कुकर,तांदूळ दीड क्किटल,मुगडाळ 26 किलो,तुरडाळ,15 किलो,मसूरडाळ 38 किलो,मटकी 25  किलो,तेल 19 किलो,असा मुद्देमाल चोरट्यानीं लंपास केला आहे. आतापर्यत दुचाकी, घरातील साहित्य, शेती पंप व अन्य साहित्याची चोरी होत होती.पंरतू चोरट्यानीं दुर्लक्षीत असलेल्या शाळातील साहित्य पळविण्याचे लक्ष वळविले आहे.यापुर्वी तालुक्यातील अन्य काही शाळातील साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी शाळांकडेही लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here