जत | नव्या डिवायएसपीसमोर मोठी आव्हाने | www.sankettimes.com

0
12

जत,(प्रतिनिधी): जत विभागीय कार्यालयाला पुन्हा महिला अधिकारी लाभले आहेत.जत,कवटेमंहकाळ, उमदी अशा तीन पोलिस ठाण्याचा भार असलेल्या जत विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे कृतृत्ववान अधिकारी नागनाथ वाकुडे यांची पुणे येथे बदली झाली आहे. त्याठिकाणी पुन्हा महिला अधिकारी शर्मिला वालावलकर यांची नियुक्ती झाली आहे. यापुर्वीच्या सिंघम अधिकारी पौर्णिमा चौगुले नंतर दिर्घ कालावधीनंतर महिला अधिकारी जतला मिळाल्या आहेत.जत,कवटेमंहकाळ, उमदी पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर व्यवसाय, वाढलेली गुन्हेगारी,व पोलिसाचा कमी झालेल्या वचक अशी अनेक आव्हाने नव्याने आलेल्या डिवायएसपी वालावलकर यांच्या समोर आहेत.तिन्ही पोलिस ठाण्यातील यापुर्वीचे अनेक गुन्ह्याचे तपास रखडले आहेत.महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भाग असल्याने चंदन, गांजा, वाळू तस्करी, बनावट दारू व शस्त्रांची तस्करी, वारंवार घडणार्‍या खुनासारख्या घटना, राजकीय व जातीय तणाव, अवैध धंदे,  शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, फाळकूट दादांची वारंवार सुरू असलेली दादागिरी असे अनेक प्रश्‍न पोलिसांसमोर आहेत. अशातच आता चोरट्यांनीही डोके वर काढलेले आहे. घरातील चोर्‍यांसोबत,दुचाकी चोऱ्या, वाटमारीच्या घटनाही सतत घडत आहेत.तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थ बिघडल्याने,असून पोलिसांचा वचक संपल्याची चर्चा आहे.वाढता राजकीय हस्तक्षेप हेही एक कारण ठरू शकते.जत शहरात नव्याने ग्रुपवॉर उदयास आले आहे.पुर्व भागातील गांजा तस्करी मोडून काढण्याचे आवाहन वालावलकर यांना पेलावे लागणार आहे.कवटेमंहकाळ एक,
तालुक्यात जत व उमदी अशी दोन पोलिस ठाणी आहेत. तरी तालुक्याचे ठिकाण असलेल्या जत,कवटेमंहकाळ पोलिस ठाण्यावरच कामाचा नेहमीच मोठा भार असतो.त्यातच सिमावर्ती भाग असलेल्या उमदी पोलिस ठाणे हद्दीतील अवैद्य धंदे संध्या रडारवर आहेत.नुकत्याच मोठ्या गांज्या कारवाईने भविष्यातील कारवाईची दिशा मजबूत करून सिमावर्ती भागातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सिंघम स्टाईल कारवाईचा धडाका नव्याने आलेल्या डिवायएसपी वालावलकर लावावा लागणार आहे.यापुर्वीचे डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांची काम करण्याची वेगळी पध्दत तिन्ही पोलिस ठाण्यातील क्राईम रेट,मोठ्या घटना रोकू शकल्या होत्या.त्यांप्रमाणे भविष्यातही होणे गरजेचे आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here