निगडी खुर्द | येथील जगताप कुटूंबीयांना प्रकाश जमदाडे यांनी दिला मदतीचा हात

0
6

येळवी,वार्ताहर:
        जत तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.वादळाच्या तडाक्यात अनेक घराचे छते उडाल्याने कुटूंबे उघड्यावर पडले आहेत. या वादळी वारेचा सर्वात जास्त फटका निगडी खुर्दला बसला आहे. वादळी वाऱ्यांत निगडी खुर्द येथील घर पडल्याने अंबूबाई जगताप या मयत झाल्या होत्या.त्याच्या पाश्चात्य जगताप कुटूंबीयांना मदतीचा हात म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी रोख पाच हजाराची आर्थिक मदत देवू केली.तसेच घरकुल योजनेतून घरकुल पंचायत समितीच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.घोलेश्वर (ता.जत) येथील संभाजी डोंबाळे यांचे घर वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाल्याने प्रकाश जमदाडे यांनी डोंबाळे यांनाही पाच हजाराची आर्थिक मदत केली.
  शासनाने फळबागाचे विमा स्वतःभरावेत.
              निगडी खुर्द,काराजनगी,येळवी सह तालुक्यातील फळबांगाचे वादळात मोठे नुकसान झाले आहे.निसर्गाची अवकृपा त्यात भरीस भर म्हणून वादळी,अवकाळी,गारपीट पाऊसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान निगडी खुर्द येथील सुदाम सावंत यांच्या नुकसानग्रस्त डाळिंब बागेचेही पाहणी जमदाडे यांनी केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शासनाने डाळिंब,द्राक्षे यासारख्या नगदी पिकाचा फळपिक विमा शासनाने भरावा अशी मागणी जमदाडे यांनी केली.
     दरम्यान सलग दोन दिवस आलेल्या वादळी वाऱ्यामूळे तालुक्यातील शाळा खोल्याचे मोठे नुकसान झालेले आहे.यात शाळेचे पत्रे,कौले,व भिंती पडल्या आहेत.अगोदरच शाळेचे दुरावस्था आहे.काही शाळांना खोल्या नसल्याने मंदीरे,खासगी ठिकाणी भरतात.15 जूनला शाळा सुरू असल्याने तत्पूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने खास बाब म्हणून जिल्हा नियोजन अथवा जि.प.स्वीय निधीतून जत तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व शाळा इमारतीची त्वरीत दुरस्ती करावी अशी मागणीही जमदाडे यांनी केली.वादळी वाऱ्यांने विद्युत खांब व विज वाहिन्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यात अनेक गावे,वाड्या वस्त्याचा विज पुरवठा अद्यापही खंडीत आहे. त्यात तातडीने दुरूस्थी करून विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेवटी जमदाडे यांनी केली.
       यावेळी पंचायत समिती सभापती सौ मंगल जमदाडे, निगडीखुर्दचे सरपंच वैभव कोळी, प्रकाश इंगवले,बाळकृष्ण शिंदे,विश्वनाथ पाटील ,सुभाष जाधव,लिंबाजी पवार,विजय रुपनूर आदी उपस्थित होते.

निगडी खुर्द येथील जगताप कुटूंबीयांना अर्थिक मदत देताना माजी सभापती प्रकाश जमदाडे व इतर मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here