जत,प्रतिनिधी:
पावसाळा तोंडावर आहे. अनेक रस्त्यांवर असलेले खड्डे नगरपालिकेने बुजविलेले नाहीत. पावसास सुरुवात झाल्यावर हे खड्डे उखडणार, नवीन खड्डे पडणार, हा दरवर्षीचा अनुभव असूनही नगरपालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. खड्यामुळे होणारे अपघात आणि पाठीचे दुखणे घेऊन येणार्यांची संख्या एकूण रुग्णांच्या 30 ते 35 टक्के असून, यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू ओढावल्यास किंवा जखमी झाल्यास, त्याला नगरपालिका जबाबदार आहे, असे कायदा सांगतो. मात्र, जतकर गेले खड्यात..! या अविर्भावात असलेल्या नगरपालिकेने शहरात एकही खड्डा नाही, म्हणून हात झटकले आहेत. दुचाकीचालकांना पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासात किती हादरे बसतात याची प्रत्यक्ष नोंद घेऊन, याचे शरीरावर काय परिणाम होतात यांचा विचार न केलेला बरा.
चौकातच मोठे खड्डे
नगरपालिका,मंगळवार पेठ,स्टेट बँक चौक,आरळी कॉर्नर, जुनी वेस रोड,त्याशिवाय शहरातील सर्वच अतर्गंत मार्गावर मोजता येत नाहीत एवढे खड्डे पडले आहेत., आले.याव्यतिरिक्त इतर ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आढळून आले आहे. दरम्यान मुख्य चौकातून अनेक वेळा किरकोळ अपघात होत असतात. या मार्गावर चौकातच खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत असून खराब रस्त्यांची दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
करा तारेवरची कसरत
दरम्यान खड्ड्यातून लहान-मोठ्या धक्के दुचाकीस्वारांना खावेच लागतात. त्याशिवाय प्रवास पुुर्ण होत नाही. याचे सर्वाधिक प्रमाण मंगळवार पेठ,जुनी वेस ते शिवाजी चौक,स्टेट बँक ते बिंळूर रोड,महाराणा प्रताप चौक ते स्टेट बँकेपर्यतच्या रस्त्यावर आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रस्ते प्लेन करण्याची आवश्यकता आहे, पावसाळ्यात यावरून दुचाक्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन डांबरीकरण यांच्या दरम्यान उंटवटे तयार झाले आहेत. पावसाळ्यात यावरून लहान टायरच्या दुचाक्या गेल्यानंतर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची व्यवस्थित पावसळ्यापूर्वी व्यवस्थित डागडुजी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
गतिरोधकांनी मोडते वाहनचालकांचे कंबरडे
सांगली रोडवरील तीन गतीरोधक असून या प्रत्येक ठिकाणी प्रवाशाला धक्के खावे लागते.मुख्य रोडही खड्डेयुक्त झाले आहेत. या धक्क्यांमुळे मनका आणि कमरेचा अजार उद्भवण्याची दाट शक्यता डॉक्टरंनी व्यक्त केली आहे यामार्गावर असलेले गतीरोधकांची उंची ही नियमापेक्षा अधिक असून, परिणामी धक्के बसत आहेत. काही
भारधाव वेगात असलेल्या चालकाला ब्रेक लावाला लागतो. त्यामुळे रिक्षा,बस, चारचाकी, दुचाकीवरील प्रवाशाला धक्का बसतो आहे. रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला खड्डे आहेत. ते पावसाळ्यापुर्वी बुजविने आवश्यक असून, सध्या या मार्गावर एकाही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, गतीरोधकांची उंची कमी करण्याची मागणी रिक्षा चालकांने केली आहे.
खड्ड्यांमुळे दुखापत झालेले 30 टक्के रुग्ण!
खडयांमुळे अपघात होउन हात-पाय, डोक्याला मार लागण्याचे प्रमाण वाढले आहे. खडयामुळे प्रामुख्याने गुडघ्याच्या लिगामेंटस (अस्थिबंधन) तुटण्याचे, कमरेच्या मणक्याला दुखापत होणे, त्यामधील गादी निसटने (स्लिपडिस्क), मानेचा मनक्याला दुखापत होणे हे अपाय होत आहेत. यामुळे एकुण अस्थिरोगाच्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण खडयांमुळे झालेल्या दुखापतीमुळे येत असून त्यामध्ये तरूणांची संख्या प्रचंड असल्याची माहिती तज्ज्ञ देतात.
अस्थिरोग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खडयामुळे दोन प्रकारचा अपघात होउ शकतो. पहिला प्रकार म्हणजे खडयातून गाडी गेल्याने गाडीवरून उडून खाली पडून डोक्याला, हाताला, पायाला मार लागून फ्रॅक्चर होणे, तसेच रस्त्यावर अचानक पडल्याने पाठीमागुन आलेले वाहन डोक्यावरून गेल्याने जीव गमावण्याची भिती असते. तर दुस-या प्रकारात खडडा पाहून गाडीला अचानक ब्रेक लावला तर त्यामुळे तोल जातो. वेगात असलेल्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी अचानक पाय टेकल्याने गुडघ्याच्या लिगामेंटस तूटल्याचे रुग्ण मोठया प्रमाणात येत आहेत. वर्षाला पुण्यात किमान 1500 पायाची लिगामेंट तुटल्याचे रुग्ण येत असल्याची माहिती शहरातील अस्थिरोगतज्ज्ञांनी दिली. तसेच खडयातून प्रवास करताना कंबर, पाठ, मानेच्या मनक्यांना दणका बसतो. हाडांची घनता आणि वय यानुसार त्या रुग्णांना त्रास होतो. यामुळे तरूणांमध्ये छाती आणि कमरेच्या मधील सात मणक्यांना मल्टिपल फ्रॅक्चर, मणक्यातील गादी सरकरणे (स्लीपडिस्क) हे प्रमाण दिसून येत आहे. तर वयोवृध्दांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने मणक्याला गंभीर दुखापत होते, आकार बदलतो. यामुळे रुग्णाला दोन ते तीन महिने आराम करावा लागतो. तरी बरे न झाल्यास लहान तसेच मोठया शस्त्रक्रिया कराव्या लागतात, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रोज एक रुग्ण
सध्या तरी गाडीवरून पडल्यामुळे एका अस्थ्रिोगतज्ज्ञाकडे एक तरी रुग्ण भेट देत आहे. त्यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. विशेषतः हे प्रमाण पावसाळयात दुप्पट ते तिप्पट होते. यामध्ये मणका, डोके, खुबा यांना दुखापत होणे, लिगामेंटस तुटणे, स्लिपडिस्क अशा स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत.
मानवी हक्कांचे उल्लंघन
खड्डे हा मानवी हक्कांचा विषय आहे. खड्डेविरहित रस्ते नसणे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ज्येष्ठ नागरिकाने खड्ड्यांच्या विषयाच्या अनुषंगाने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे. खड्डे रस्त्यावर असणे हे चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण नाही. रस्त्यांवर खड्डे असणे म्हणजे पायाभूत सुविधांच्या दर्जामध्ये भ्रष्टाचार आहे, हा त्याचा अर्थ आहे. पालिकेने याबाबत कॉन्ट्रॅक्टरला दोषी धरण्याची तरतूद केली पाहिजे.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्त्यांचे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडे होते, यासंबंधी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता पाट्या लावल्या जातात. लोकांना जर तक्रार करायची असेल तर ती कोणाविरोधात करायची ते माहिती पाहिजे. कामामध्ये त्रृटी उद्भवल्या तर अशा कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरले पाहिजे. त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवतानाच तुमच्या सेवेत त्रृटी आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नागरिकांना राहतील, अशा पद्धतीचे पाऊलदेखील पालिकेनी उचलण्याची गरज आहे. त्यानंतर नागरिकांना ग्राहक न्यायालयांमध्येही दाद मागता येईल.





