जत | मुलाच्या मुत्यूस कारणाभूत ठरलेल्या चालकास 3 महिने कारावास, व 54 हाजार दंडाची शिक्षा डफळापूर येथील घटना:बेजबाबदारपणे वाहन चालविण्याने अपघात

0
5

जत,प्रतिनिधी: मिरवाड ते डफळापूर रोडवर्ती माळीवस्तीजवळ 6 जून 2014 बेजबाबदार पणे वाहन चालवून एका मुलाच्या मुत्यूस कारणाभूत ठरलेल्या आरोपी प्रकाश रामचंद्र शिंगे(वय-30,रा.डफळापूर) याला जबाबदार न्यायालयाने 3 महिने कारावास,4 हाजार रूपये दंड, व पिडित मुलाच्या कुंटुबास 50 हाजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एस्.आर.पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
1 जून 14 ला 1 वाजनेच्या सुमारास डफळापूर-मिरवाड रोडवर हा अपघात झाला होता.चालक रामचंद्र शिंगे यांने छोटा हत्ती(एमएच-10,एक्यू-5935)यात मयत दिपक विलास नंदीवाले वय-9 व इतर 3 मुलांना वाहनात बसवून घेऊन जात असताना वाहन भरधाव वेगाने,अविचारी,निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष वाहन चालवून अचानक पणे ब्रेक मारल्याने मयत दिपक वाहनाच्या फाळक्यावरून आदळून रोडवर पडल्याने जखमी झाला.त्यात त्याचा मुत्यू झाला होता.चालक प्रकाश मुत्यूस कारणाभूत झाला म्हणून भा.द.वि.279,304(अ) व मो.वा.का.क.184 प्रमाणे अपराध केल्याने त्यांचेवर गु.र.नं.130/14 जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यांचा तपास तपासिक अधिकारी ए.पी.कत्ते(पीएसआय)यांनी करून मे.कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संतोषकुमार पताळे यांनी सहा साक्षीदार तपासले,त्यामध्ये फिर्यादी,पंच,नेत्र साक्षीदार,तपासिक अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.आरोपीनेच सदर गुन्हा केल्याचे व त्यामध्ये निष्काळजीपणा असलेचा महत्वपुर्ण युक्तीवाद संतोषकुमार पताळे यांनी केला.तो मान्य करून जत न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एस्. आर.पाटील यांनी अरोपीस भा.द.वि.279 अन्वये 3 महिने कारावास, व 3 हाजार रूपये दंड,भा.द.वि.304(अ)अन्वये 3 महिने कारावास व 2 हाजार रूपये दंड, तसेच मयत मुलाच्या आई-वडीलास नुकसान भरपाई म्हणून 50 हाजार रूपये देण्याचे आदेश दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here