सामान्य कार्यकर्ताचा आधारवड ,विकासाचा आस असणारा,कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेता.- प्रकाश जमदाडे

0
17



         कै.सुनिलबापू चव्हाण,कै.अशोकदादा शिंदे यांचे प्रेरणेने प्रकाश जमदाडे राजकारणात आले.मा.आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या कामाला मोठे बळ दिल्याने प्रकाश जमदाडे(साहेब)झाले.आमदार विलासराव जगताप यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.प्रत्येक गावातील कार्यकर्ता माहिती असणारा व तालुक्याच्या विकासाची आस असणारा आ.विलासराव जगताप( साहेब)यांच्यानंतर प्रकाश  जमदाडे शिवाय दुसरा नेता नाही.

          जीवन प्राधिकरणमध्ये (पाणी पुरवठा)स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून नोकरी लागलेले प्रकाश जमदाडे यांनी १०वर्ष नोकरी करुन समाजसेवेसाठी राजकारणात आले.अन्यथा आज ते उपअभियंता पर्यंत पोहचले असते.सन २००१ साली  सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ची उमेदवारी आ.जगताप साहेबानी दिली.व जिल्हात १क्रमांकाच्या मताने निवडून आले.व श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत चे सभापती झाले.सन २००७ मध्ये जत व कवठेमंहकाळ बाजार समितीचे त्रिविभाजन करण्याचा ठराव झाला.त्यावेळी त्यांनी जत ,कवठेमहकांळ तालुक्यातील संचालकना एकत्र करुन ठरावास विरोध केला.अगदी उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालया कडे याविरोधात दाद मागितली.अखेर यश आले सर्वोच्च न्यायालयाने त्रिविभाजनचा ठराव रद्द केला.२००८ मध्ये मा.जयंतरावजी पाटील साहेब यांचे नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल उभे केले त्यावेळी परत आ.विलासराव जगताप यांनी प्रकाश जमदाडे यांना बाजार समितीची उमेदवारी दिली.व जिल्हात १ क्रमांकाच्या मतानी निवडणून आले.२००९ ला सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती झाले.आणि त्यांनी तीन वर्षाच्या कालवधीत अतिशय उत्कृष्ट काम केले.बाजार समिती म्हणजे काय असते ते कामातून महाराष्ट्राला दाखवून दिले.सभापती बदल करु नका म्हणून भेटायला गेलेल्या नेत्यांना जयंत पाटील म्हणाले कि,पहिला सभापती  आहे कि बाजार समितीचे उत्पन्न ५कोटीवरून १२.५० कोटी पर्यंत नेले .जतच्या वैभवात  भर घालणारे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल ,जगदजोत्ती बसवेश्वर महाराज सभागृह ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धान्य चाळण यंत्र व डाॅ बाबासाहेब आंबेडकर भाजी कट्टा अशी वेगवेगळी विकासकामे आ .विलासराव  जगताप यांचे नेतृत्वाखाली पूर्ण केली .बेदाणावरील व्हॅट रद्द करणेसाठी सांगली ,तासगाव ,पंढरपूर,व नाशिक बाजार समितीला एकत्रीत आणून खा.संजयकाका पाटील यांचे मार्फत आदरणीय शरद पवार साहेब यांची तीन

वेळा भेट घेवून व्हॅट रद्द केला .व्यापारी शेतकरी ,तोलाईदार यांचा समन्वय साधून विकासकामे पूर्ण केली.खा.संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १५ कोटीच्या प्रजोक्ट ७५ टक्के अनुदानातून बेदाणा प्रोसेसिंग युनिट मंजूर करुन घेतले होते.जत ला गेल्या ५० वर्षा पर्यत कोणी काम केले नव्हते ते काम प्रकाश जमदाडे यांनी तीन वर्षात करुन मार्कट यार्डाचा चेहरा मोहरा बदलला.

             १९७१ पासून गुड्डापूर  साठवण तलाव मंजरीकरिता प्रतिक्षाधिन होता.तो तलाव ना.जंयत पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतला.त्याचबरोबर मोटेवाडी ,कोळिगिरी ,कोसारी ,खोजनवाडी ,गुगवाड इ .साठवण तलाव जयंत पाटील अर्थमंत्री असताना आ.विलासराव जगताप यांचे माध्यमातून पाठपुरावा करुन मंजूर करुन पूर्ण केले.तालुक्याचा विकासासाठी सतत मोर्चे ,रस्ता रोको ,उपोषण ,इ.अवलंबून सतत पाठपुरावा केला.जत प्रांत कार्यलय मंजूरीसाठी कै.सुनिल बापू चव्हाण,यांचे बरोबर कै.ना.आर.आर .पाटील कै.डाॅ.पतंगराव कदम यांचेशी पाठपुरावा करून मंजूर करणेत सिहांचा वाटा  आहे.

              सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती असताना उमदी पोलिस ठाण्यात माजी सभापती बसवराज बिराजदार व अन्य कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्याने पीएसआय ला जाब विचाराले प्रकरणी   प्रकाश जमदाडे यांच्यावर पीएसआय  यानी गुन्हा दाखल केला व जत न्यायालयात अटकेची परवानगी मागतिली .वस्तुस्थिती समजल्यानंतर खा .संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप यांनी डीआयजी तुकाराम चव्हाण यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन केस काढून घेतली कायम कार्यकरत्याच्या पाठीशी आ जगताप खंबीरपणे उभा राहतात.त्यांचा आम्हास सार्थ अभिमान आहे.२०१७ च्या पंचायत समिती गणात  त्यांच्या पत्नी  सौ.मंगल जमदाडे यांना उमेदवारी दिली.विघ्नसंतोषी लोकांनी जातीयवादाचा प्रचार केला.जातीचे कार्ड मतदारासमोर केले .पण ते साफ धुडकावत सौ मंगल जमदाडे प्रचंड मतांनी निवडून आल्या.यावेळी जनतेशी असलेले सलोख्याचे  संबध कामी आले.व आमदार विलासराव जगताप यांनी सौ मंगल जमदाडे यांना पंचायत समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी सौ .मंगल जमदाडे यांना दिली .प्रकाश जमदाडे यांचे सर्व पक्षात मित्र आहेत.पंरतु त्यांनी मैत्री आणि राजकारण यांची कधी गफलत केली नाही .म्हणून तर गेली २० वर्षापासून ते राजकारणात टिकून आहेत.

           आज त्याचे सर्व कुटूंब एकत्र आहे.त्याचे धाकले बंधू दर्याप्पा  जमदाडे हे रजि. गव्हरमेंट काॅन्ट्रक्टर आहेत .त्यांच्याकडे जवळपास ७० लोक काम करतात.यातून ७० कुटूंबाचा प्रपंचा चालवितात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही स्वखर्चाने वेगवेगळ्या गावाना गरजोउपोयगी कामे पूर्ण केली आहेत.कोणतेही निवडणूक म्हटले कि प्रकाश जमदाडे यांचे नियोजन उत्तम  असते  उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख  तालुक्यात आहे . म्हणूनच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील ,संजयकाका यांची विशेष मर्जी त्यांच्यावर आहे .आमदार विलासराव जगताप यांचा कोणताही शब्द मोडत नाहीत. आमदार विलासराव जगताप साहेबानी  हत्तीचे बळ दिले आहे.ज्या ठिकाणी काम करणेची संधी दिली तिथ त्या खुर्चीचा सन्मान राखणेचे /वठविणेचे प्रयत्न प्रकाश जमदाडे यांनी केलेले आहे .अश्या कार्यकर्तास लाख लाख शुभेच्छा .त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना…


बसवराज बिराजदार माजी सभापतीपरशुराम चव्हाण सर (डफळापूर)रामण्णा जिवाण्णावर बिळूर. पंचायत समिती सदस्यसौ.श्रीदेवी जावीर सदस्या पंचायत समिती जत विष्णू चव्हाण सर सदस्य पंचायत समिती जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here