एसटी महामंडळाचे चालक शिवाजी रामराव चव्हाण डफळापूर हे आज तीस वर्षाच्या विनाअपघात एसटी बसच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. गेल्या तीस वर्षापासून विनाअपघात सेवा बजावून आपल्या नोकरी काळात वेगळेपण जपणारे चव्हाण(काका) यांच्या सेवानिवृत्ती बद्दल त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा..
डफळापूर-अंनतपूर रोडवर मिरवाड नजिक शेती असणारे चव्हाण(काका) यांची हालाक्याची परिस्थिती होती.1985 च्या दशकात कोल्हापुरातील महाडिक पेट्रोल पंपाच्या ट्रॅकरवरून चव्हाण(काका) यांनी डायव्हर म्हणून काम सुरू केले होते.अगदी तुटपुज्या पगारावर कुंटुबियांचा उदरनिर्वाह सुरू होता.त्यादरम्यान 1988 ला शिवाजी चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक पदासाठी अर्ज भरला.त्यात त्यांची निवड झाली.1 मार्च 1988 साली ते एसटी महामंडळाच्या जत आगारात चालक म्हणून रुजू झाले.त्यावेळी चव्हाण (काकाचां) पहिला पगार 1700 रुपये होता.मिळेल तेवढ्या पगारात त्यांनी कुंटुब चालवित दिवस ढकले,त्यांनतर तब्बल दहा वर्षानंतर त्यांच्या कष्ठाला फळ मिळाले.पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. एसटीची नोकरी करत असताना त्यांनी येणाऱ्या पगारावर आपल्या वडिर्लाजित शेतीची दुरूस्थी केली.कष्ठाची चांगली जोड, कुंटुबियाची चांगली साथ मिळाल्याने त्यांचे शेतीतील उत्पन्न वाढू लागले.दोन्ही मुलापैंकी एकजण शेती,एकजण दुग्ध व्यवसाय करतो.मुलाचे व्यवसाय चांगले सुरू आहेत.
निव्वळ डाल डब्बा म्हणून ज्या एसटीकडे बघितले जाते.त्या एसटीच्या माध्यमातून शिवाजी चव्हाण(काका) सारख्या चालकांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले आहे.
चव्हाण(काका) यांना विना अपघात चालक म्हणून एसटीच्या वतीने तीनवेळा प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.चांगल्या कामाची पावती म्हणून चव्हाण काका यांना 1988 ते आज 2018 पर्यत जत या एकाच डेपोत नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.एसटीचे चालक म्हणून काम करताना चव्हाण काका यांनी डफळापूर येथे समाज कार्यातही अग्रेसर असतात.गेल्या तीस वर्षात निव्वळ एसटीच्या आर्शिवादामुळे मी उन्नती करू शकलो आहे.अपार कष्ठ,नशीबाची साथ,स्वच्छ प्रतिमा यामुळे चव्हाण काकांनी जे उभे केले आहे. ते एसटीत नोकरी करणाऱ्या नवतरूणांना आदर्श ठरेलं असे आहे.
एसटी आम्हची जिवनदाहिनी ठरली आहे.एसटीच्या मुळे आज आम्ही सक्षम झालो आहोत.असे सेवानिवृत्ती निमित्त बोलताना चव्हाण(काक) यांनी सांगितले. निवृत्तीनंतर समाज कार्यात काम करण्याचा मानस चव्हाण त्यांनी बोलून दाखविला.
एसटीच्या नोकरीतून आदर्श व्यक्तिमहत्व ठरलेेले शिवाजी चव्हाण काका यांनी एसटीची आठवण कायम ठेवली आहे.डफळापूर येथील एकविरा तरूण मंडळाच्या वतीने शिवाजी चव्हाण यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.







