जत,प्रतिनिधी: खलाटी ता.जत येथे बेकायदेशीर गावठी, देशी दारू,व सिदींची विक्री अड्ड्यावर जत पोलिसांनी छापा टाकून 3 हाजार 676 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यात 63 बॉटल देशी दारू,वीस लिटर सिंदी,रोख रक्कम 950 रूपये मिळून आले.याप्रकरणी विक्री करणाऱ्या एका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सा.पोलिस निरिक्षक विजय चव्हाण, रणजिंत गुडरे,कॉन्टेबल सचिन माने,गोपाळ राठोड,वाहेद मुल्ला,यमगर,स्वप्नाली निकम,अर्चना शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.
जत-नागज रस्त्यावर अपघातात एकजण ठार
जत,प्रतिनिधी: जत-नागज रस्त्यावर हॉटेल सरदार समोर अपघात होऊन ठार झालेल्या एकाचा मृतदेह आढळला.बाळू तातोबा रूपनूर वय-28 असे ठार झाल्यालेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मदन यंशवतराव माने यांनी जत पोलिसात दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवलादार पवार करत आहेत.
जत,प्रतिनिधी: आंवढी ता.जत येथील प्रकाश बाळू ऐवळे यास अंघोळीचे पाणी आमच्या अंगणात सोडलेस म्हणून दोघांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद ऐवळे यांनी जत पोलिसात दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,प्रकाश ऐवळे यांच्या मुलांने पाणी ओतले ते बेडगे यांच्या अंगणात गेल्याच्या कारणावरून नितिन आप्पासाहेब बेडगे, आप्पासाहेब कोंडिबा बेडगे यांनी विट काठीने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जत,प्रतिनिधी : रेवनाळ ता.जत येथील दशरथ बिरा काळे वय-19 वर्षे या शालेय विद्यार्थ्यांने राहत्या घरासमोरील झाडाला दोरीने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी 4.30ला उघडीस आली. याप्रकरणी धनाजी बाळासाहेब पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.आत्महत्ये नेमके कारण समजू शकले नाही.
जत, प्रतिनिधी: एंकूडी ता.जत येथील बसगोंडा परगोंडा पाटील याला सोमवारी सायकांळी मतदान आमच्या विरोधात का टाकलास म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. बसगोंडा यांच्यावर मिरज येथे उपचार करून त्यांने बुधवारी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, एंकूडी येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.त्यात पराभव झालेल्या पार्टीच्या चौघांनी बसगोंडा यांला विरोधात मतदान का केलेस म्हणून चाकू,दगडांनी मारहाण करून जखमी केल्याचे आहे.बसगोंडा यांनी दिलेल्या तक्रारीत बसवराज चिंदानंद पाटील, मलगोंडा बसगोंडा पाटील,बाबासो बसगोंडा पाटील,सदाशिव लक्ष्मण शेगावे यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.



