जत | गुरूदेवाश्रम बालगाव येथे योगदिनी ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सव सिध्देश्वर महास्वामीजी,1 केंद्रिय,10 राज्यातील, कर्नाटकच्या 1 मंञ्यांच्या उपस्थितीत सोहळा : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदणी होणार

0
7

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बालगाव येथील गुरूदेवाश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरूवार ता.21जूनला सकाळी 9.30 वाजता ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सव साजरा होणार आहे. या शिबिरासाठी अधात्मातील गुरूवर्य श्री.सिध्देश्वर महास्वामीजी,1 केंद्रीय,10 राज्यातील,1 कर्नाटकतील मंत्री उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटकातून एक लाख विद्यार्थी,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक या सुर्य नमस्कार योग साधनेसाठी उपस्थित राहणार आसल्याची माहिती आश्रमाचे  प्रमुख अंमृतानंद महास्वामी यांनी पत्रकार बैठकीत दिली.यावेळी आमदार विलासराव जगताप,माजी सभापती आर.के.पाटील, डॉ.रविंद्र आरळी,प्रभाकर जाधव,अॅड.श्रीपाद अष्टेकर,चंद्रकात गुड्डोडगी, आप्पासाहेब नामद,रामपुरचे माजी संरपच मारूती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अंमृतानंद महास्वामी पुढे म्हणाले, या उत्सवातील उपस्थित एक लाख लोकांची गिनिज बुक ऑफ वल्ड मध्येही नोंदणी होणार अाहे.तसे जिल्हाधिकारी यांना सुचित केले आहे. उपस्थितांची नोंदणी करण्यात येईल.हा कार्यक्रम गुरूवर्य श्री.सिध्देश्वर महास्वामीजीच्या सानिध्यात,आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
जत सारख्या ग्रामीण भागातील नागरिकाना योगाचे महत्व कळावे,योग साधनेचा प्रसार व्हावा या उद्देशाने या योग-उत्सवाचे आयोजन केले आहे.
जतसह सिमावर्ती कर्नाटकातील तिन तालुक्यात यां योग उत्सवाचा प्रचार केला आहे. प्रत्येक प्रायमरी,माध्यमिक शाळेतील मुंलाना विशेष योग प्रशिक्षित शिक्षकाकडून गेल़्या पंधरा दिवसापासून अभ्यास घेतला जात आहे.
यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात एक केंद्र बनवून त्या केंद्रात एक योग प्रशिक्षित शिक्षकाद्वारे प्रसार व ट्रेनिंग दिले जाणार आहे.या उत्सवासाठी एक प्रशिक्षित शिक्षक दररोज दहा गावात प्रचार करतीलं.जत तालुक्यातील प्राथमिक शाळेतील पन्नास हाजार विद्यार्थ्याचा सहभाग अपेक्षित आहे.लगतच्या सिमावर्ती कर्नाटकातील दोन तालुक्यातील प्रायमरी व माध्यमिक शाळेतील पत्तीस हाजार व पंधरा हाजार नागरिक यात सहभागी होतील. त्यांना विविध माध्यमातून ट्रेनिंग दिले जात आहे.
अंमृतानंद महास्वामी म्हणाले,
या योग उत्सवासाठी आश्रमाच्या तीस एकर जागेत तयारी सुरू असून भव्य स्टेज,स्क्रिन,ड्रोन व इतर कँमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. सर्व तीस एकर परिसरात बसण्यासाठी मँट टाकण्यात येणार आहे. भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी लोकसहभाग मिळाला असून अनेक दानशूर लोकांनी भोजनासाठीचा खर्च उचलला आहे.
बुधवारी सकाळी 9.30 ला कार्यक्रम सुरू होणार अाहे. अर्धा तास सुर्यनमस्कार हा योग प्रकार होणार असून त्यांनतर उपस्थित विविध मान्यवराचे मार्गदर्शन,व मल्लखांबचे प्रात्याक्षिक होईल.
योग उत्सवाचे सर्व नियोजन सुरू झाले आहे. मोठी गर्दी लक्षात घेऊन सर्व उपाययोजना केल़्या आहेत. या कार्यक्रमासाठी खासकरून श्री.सिध्देश्वर महास्वामीजी,केंद्रातील एक मंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री सुभाष देशमुख सह राज्यातील 10 मंत्री, कर्नाटकतील 1 मंत्री उपस्थित राहणार आहेत.,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सर्व आमदार, सभापती, विभागप्रमुख, परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत समिता सदस्य, आजी माजी संरपच  व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आसल्याचेही अंमृतानंद महास्वामी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनानुसार योग प्रसार देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. पंरतू तो शहरी भागापुरता मर्यादीत राहू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात योगाचे महत्व कळावे यासाठी जत सारख्या दुष्काळी भागात या ऐतिहासिक योग-उत्सवाचे आयोजन केले आहे. योग घराघरात पोहचला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.यासाठी योग शिक्षकही तयार करण्याची मोहिम सुरू असल्याचेही अंमृतानंद महास्वामी सांगितले. या ग्रामीण ऐतिहासिक योग-उत्सवात मोठ्या संख्येंने सामिल होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहनही अंमृतानंद महास्वामीनी केले.

गत वर्षी योग दिनी योग-उत्सवात सुमारे 80 हाजार विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित लावली होती.त्यांची संख्या नोंदणी झाली होती. गतवेळी वर्ल्ड रेकार्ड थोडक्यात चुकले होते.यंदा एक लाख जणांनी उपस्थिती निश्चित आहे. तसे जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.येणाऱ्या प्रत्येकांची नोंदणी केली जाईल.असेही अंमृतानंद महास्वामीजीनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here