येळवी | तिंकोडी-करेवाडी रस्त्यावरील अपघातात एक ठार | www.sankettimes.com

0
8

येळवी,वार्ताहर:जत तालुक्यातील तिकोंडी करेवाडी रस्त्यावरून स्प्लेंडर (एमएच-09,इव्ही-9567)या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून लक्ष्मण शामराव बंडगर व बजरंग आनंदा कोळी (वय-40,रा.शिरटी ता.शिरोळ जि.कोल्हापूर)हे जात होते.लक्ष्मण शामराव बंडगर हे मोटारसायकल चालवत होते.जालीहाळ फाट्याच्या जवळ रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या दगडास मोटरसायकल धडकल्याने बजीरंग आनंदा कोळी हे मयत झाले.लक्ष्मण बंडगर  हे जखमी झाले.ही घटना ता.24 ला घडली.अशी फिर्याद मारुती उर्फ सुरेश आनंदा कोळी यांनी उमदी पोलिसात दिली.ही घटना नोंद असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here