जत | कॉग्रेस तीन,भाजपची 2 ग्रां.प.वर बाजी सर्वच गावात सत्तांतर : बिंळूरमध्ये फेरमतमोजणीनंतरही भाजपचाच विजय

0
4

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत पाचपैकी तीन ग्रामपंचायतीवर कॉग्रेस तर दोन ठिकाणी भाजपने बाजी मारली. यापुर्वी कोणबगी बिनविरोध झाली आहे.
सोमवारी उमदी,कोतेबोंबलाद,बिंळूर, खिलारवाडी, गुंलगुजनाळ ग्रा़.प़.निवडणुकीची मतमोजणी झाली़ सर्व ठिकाणी संत्तातर झाले आहे.
पोटनिवडणूकीत एंकूडीत एक जागेसाठी झालेल्या निवडणूकीत केवळ एका मताने विजयी झाला. गुंलगुजनाळ येथील वार्ड.3 मधील मालन एकनाथ चव्हाण या समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजयी झाल्या.हे या निवडणूकीतील वैशिष्ट्ये ठरले.
भाजप आमदार विलासराव जगताप यांच्या कोबोंबलाद गावामध्ये त्यांची 40 वर्षाची सत्ता संपुष्ठात आली.येथे कॉग्रेसने थेट संरपच पदासह 7 जागा जिंकत सत्ता मिळविली. भाजपला 4 जागावर समाधान मानावे लागले. येथे आमदारांना मोठा फटका बसला आहे. कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांच्या समर्थंकानी आपले होमगाऊंड उमदीसह गुंलगुजनाळ, को.बोबलाद या गावात सत्ता मिळविली.अत्यंत चुरसीने झालेल्या या ग्रामपंचायत निवडणूकीत कॉग्रेसचे बळ पुन्हा काहिसे वाढल्याचे चित्र आहे.गुंलगुजनाळ येथे थेट संरपच पदासह कॉग्रेसला 3,तर भाजपला 3 जागा मिळाल्या.उमदीत झालेल्या तुल्यबंळ लढती निवृत्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला थेट संरपच पदासह 11 तर भाजप-राष्ट्रवादीच्या पँनेलला 6 सदस्यावर समाधान मानावे लागले.अतिसंवेदनशील कोतेबोबलाद मध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली.येथे आमदार विलासराव जगताप यांच्या गटाचे गेल्या चाळीस वर्षापासून सत्ता बदलली.येथे कॉग्रेस प्रणित पँनेलला थेट संरपच पदासह 6 सदस्य तर भाजपला 3 जागा मिळाल्या. खिलारवाडीत सर्व सदस्य यापुर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.ते भाजपच्या गटाचे आहेत.संरपच पदासाठी झालेल्या निवडणूकीतही भाजपचाच उमेदवार विजयी झाला.बिंळूर ग्रामपंचायतीत कॉग्रेसची अनेक वर्षाची सत्ता सोडावी लागली. तेथे भाजप प्रणित रामाण्णा जिव्वाणावर यांच्या नेतृत्वाखालील थेट संरपच पदासह 10 सदस्य तर कॉग्रेसला 7 जागावर समाधान मानावे लागले.
पोटनिवडणूकीत सत्ताधारी गटाकडे काही जागा राहिला आहेत.

विजयी थेट संरपच
गुंलगुजनाळ:विष्णू भाऊसाहेब गोपणे, खिलारवाडी :भाऊसाहेब द्रोपती लोंखडे,बिंळूर: नागनगोंडा आप्पासाहेब पाटील,कोंतेबोबलाद :पुडलिंक बसाप्पा कांबळे,उमदी : वर्षा निवृत्ती शिंदे,कोणबगी,कोणबग्गी : रेवाणासिध्दा गिरमल्लाप्पा रगटे

विजयी पॅनेलच्या समर्थंकांनी असा जल्लोष केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here