जत,वार्ताहर:मेंढिगिरी( ता.जत) येथील नवविवाहिता वैशाली प्रकाश सरक (वय-19, रा.मेढिगिरी) या नवविवाहिताने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबतची वर्दी मेंढिगिरी सरपंच सुभाष बिराजदार यांनी जत पोलिसात दिली आहे.आत्महत्याचे अद्याप कारण समजू शकले नाही. वैशाली प्रकाश सरक हिचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांचे माहेर मदभावी ता.अथणी (कर्नाटक) या गावचे होते. पुढील तपास पोलिस फौजदार ए.डी.कत्ते करीत आहेत.





