बनाळी | भाजप नेते प्रकाशरावजी जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बनाळीत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन | www.sankettimes.com

0
6

बनाळी,वार्ताहर: बनाळी ता.जत येथे माजी सभापती तथा भाजपचे ताकतवान नेते माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार ता.30 मे रोजी भव्य नाईट अंडर-आर्म क्रिकेट स्पर्धा व ता.1 जुन रोजी सकाळी 10.00 वाजता भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धेत प्रथम- 7,777,द्वितीय-5,555,तृत्तीय-3,333 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.स्पर्धेचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते,माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे,नगरसेवक विजय ताड,उमेश शांत,सुनिल पवार,प्रमोद सांवत,राजू चौगुले, राजू यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावा असे आवाहन संयोजक मिलिंद बापू पाटील युथ फांऊडेशन बनाळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here