जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीचा व 3 गावच्या पोटनिवडणूकीसाठीचा प्रचाराचा धुरळा शुक्रवारी थांबला आज गुप्त प्रचाराचा दिवस असून रविवारी मतदान आहे.सोमवारी निकाल लागणार आहे.
जत तालुक्यातील उमदी, कोतेबोंबलाद,गुंलगुजनाळ,बिंळूर, खिलारवाडी, कोणबगी सह अन्य तीन गावात निवडणूक होत आहे. प्रंचड टोकाचा प्रचार, अारोपपत्यारोपाने गावे दणाणली आहेत.आमदार विलासराव जगताप यांचे गाव असलेल्या कोतेबोबलाद मध्ये तगडा संघर्ष दिसत आहे. दुसरीकडे कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांचे होम गाऊंड असलेल्या उमदीत कॉग्रेसचे पारडे जड आहे. बिंळूर मध्ये कॉग्रेस विरूध भाजप तुल्यबंळ लढत होत आहे.बाकी गावात स्थानिक जोडण्या करून निवडणूकीत पॅनेल उभी केली आहेत.गावचा विकास,गट,राजकीय आस्तित्व यावर भर देत निवडणूकीचा प्रचार रंगला आहे.सर्वच पक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही बाजूच्या पॅनेलच्या प्रमुखांनी विजयाचा दावा केला जात आहे. आज शेवटचा दिवस असल्याने नेते,पॅनेल प्रमुखाची कसोटी होणार आहे. अतिसवेंदनशील कोतेबोबलाद सह उमदी, बिंळूर व अन्य गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांततेत, कायदासुव्यस्था आबाधित ठेवून भयमुक्त निवडणूक पार पाडावी,कोणत्याही स्थितीत कायद्याचा भंग होईल असे कृत्य होऊ नये यांची काळजी घ्यावी,असे आवाहन डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे यांनी केले आहे.
Home Uncategorized जत | ग्रामपंचायत निवडणूक : आज गुप्त प्रचार कोतेबोंबलाद,उमदी, बिंळूरमध्ये अटीतटीची...





