जत | तुकाराम माळी, प्रकाश देवकुळे यांना “आदर्श सामाजिक कार्यकर्ता” पुरस्कार |

0
4

जत,प्रतिनिधी : येथील ओबीसीचे नेते तुकाराम माळी व दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश देवकुळे यांची समाजिक समता महोत्सवच्या  वतीने दिला जाणारा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
समाज परिवर्तन चळवळीमध्ये अंत्यत प्रामाणिकपणे आणि निष्ठापुर्वक कार्य करणाऱ्यां शैक्षणिक,सांस्कृत्तीक, व सामाजिक कार्याची दखल घेऊन सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने सामाजिक समता महोत्सवात माळी व देवकुळे यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.सामाजहितासाठी प्रयत्न करणाऱ्या या मान्यवरांचे कार्य अखंडपणे चालू रहावे,त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ह्या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ता.14 मे 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता रामराव विद्यामंदीर हायस्कूलमध्ये महोत्सवात गौरविण्यात येणार आहे.

अटैचमेंट क्षेत्र

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here