जत,प्रतिनिधी: तिप्पेहळ्ळी (ता.जत) येथील बाळासाहेब दादासो शिंदे यांच्या ऊसाच्या शेतात लावलेला तीन लाख आठरा हजार रूपयांचा गांजा पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांच्या पथकांने जप्त केला.
शिंदे यांच्या बिरनाळ रोडवरील गट नं 37 या शेतात ऊसाची लागवड केली. ऊसात गांजाची झाडे लावल्याची माहिती उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकासह शनिवारी दुपारी छापा टाकला. त्यात 45 किलो 500 ग्रँम वजनाची गांजाची झाडे जप्त केली.त्याची किंमत 3 लाख 18 हजार रुपये आहे.
या कारवाईत उपअधिक्षक वाकुडे ,सहा पोलिस निरिक्षक गजानन कांबळे, विजय चव्हाण,हेड कॉन्टेबल केरबा चव्हाण, राजू कांबळे, महेश मुळीक,आप्पासाहेब हाक्के, विजय वीर, सागर पाटील, परमेश्वर ऐवळे, प्रिंयका कांबळे यांनी सहभाग घेतला.
तिप्पेहळ्ळी ता.जत येथे गांजा शेतीवर छापा टाकून पकडलेला गांजाची झाडो संशयित आरोपी बाळासाहेब शिंदेसह पथक





