जत,प्रतिनिधी:
जत शहरातील मध्यवर्ती किस्मत चाैकात पांडूरंग लक्ष्मण कोळी वय-54 रा.जत यांच्यावर कोत्यांने हल्ला करण्यात आला. त्यात कोळी गंभीर जखमी झाला असून जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास हा हल्ला झाला. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. कोळी यांनी जत पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,
जत शहरात मध्यवर्ती किस्मत चाैकात कोळी यांचे नाष्ठा सेंटर आहे.तेथे आलेल्या विकास अशोक कांबळे रा.विठ्ठलनगर,जत यांने कोळी याला गणेश साळेला का का मारलेस यांचा जाब विचारत संशियत आरोपी कांबळेने कोत्यांने कोळीवर हल्ला केला त्यात जोरदार झटापट केली. त्याच्यावर कोत्याने वार केले. त्याच्या डोके, मानेवर गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यानंतर हल्लेखोराने कोयता फेकून पलायन केले. गंभीर जखमी कोळीस ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान मटक्यातील आर्थिक व्यवहारातून हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे.





