माडग्याळ,वार्ताहर:
संख व उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू तर माडग्याळचे काय ?
खेरतर प्रांरभी संख उमदीच्या वादात माडग्याळ तालुका होण्याची चर्चा होती. त्या धर्तीवर माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय देखील बांधण्यात आले होते. मात्र ऐनवेळी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या संखला अप्पर तहसिल कार्यालय झाले.उमदीच्या तीव्र विरोधाने तेथेही आठवड्यातून दोन अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे.या सर्व प्रक्रियेत माडग्याळला डावल्याचे चित्र आहे. त्यामुळे माडग्याळ परिसरातील नागरिकातून शासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
जत तालुक्याचा विभाजन करून स्वतंत्र माडग्याळ तालुका करण्याची मागणी होत असताना शासनाने माडग्याळाला डावलून तुर्तास संख अप्पर तहसीलदार कार्यालय करण्याचे आदेश जारी होती. तेथे कार्यालय सुरू झाले. माडग्याळकरांनी न्यायालय आवाहन दिले, गाव बंद,मुकमोर्चा, उपोषण अशी अंदोलने करूनही शासनाने यांची दखल घेतली नाही.दरम्यान माडग्याळ मध्येही दोन दिवस अप्पर तहसिल कार्यालयाचे कामकाज चालू पाहिजे असे मत माडग्याळकरांतून व्यक्त होत आहे. माडग्याळला जोडणारे जवळची गावे सनमडी,घोलेस्वर,मायथळ,आदी गावे येतात.एकंदरीत माडग्याळचे नाव तालुक्यासाठी चर्चेत असतानाही डावल्याने माडग्याळ करांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे.