
कोंतेबोबलाद मधील दलित उमेदवारांवरील हल्ल्याच्या निर्षेधार्थ बुधवारी जत बंदची हाक
जत,प्रतिनिधी:कोंतेवबोबलाद(ता.जत)येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग का घेतला या कारणावरून आमदार समर्थकांनी पाच मागासवर्गीयांना मारहाण करून जखमी केले आहे.हा प्रकार निंदनीय आहे.हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीने बुधवारी जत बंद करणार असल्याची माहिती जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती व बसपाचे नेते भूपेंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.कांबळे पुढे म्हणाले, कोंतेवबोबलाद या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदासाठी अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. या ठिकाणी कॉंग्रेस व बसपा यांची युती आहे. सरपंच पदासाठी श्रीशैल बसपा कांबळे हे कॉग्रेस आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार अाहेत.त्याचा राग मनात धरून आमदार समर्थक मनोज जगताप, रमेश जगताप, तुकाराम जगताप यांच्यासह नऊ जणांनी घरात घुसून पाच मागासवर्गीय पुरुष व महिलांना घरबाहेर काढून जबर मारहाण केली आहे. तसेच सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा नाही असा दम दिला आहे.हे लोकशाही विरोधात आहे.निवडणूक लढविण्याचा आधिकार सर्वांना आहे. देशातील मोदी सरकार हे दलितांच्या बाजूने आहे,असे सांगतात. मात्र तालुक्यातील आमदारांची कार्यकर्ते दलितावर अन्याय अन्याय करीत आहेत. सरपंच पदाची निवडणूक लढवू नये यासाठी दलितावर त्यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण सुरू केले आहेत. त्यासाठी या तालुक्यातील लोकशाही वाचविण्यासाठी तालुक्यातील बसपा रस्त्यावर उतरणार आहे. बुधवार 25 रोजी जत बंद पुकारून निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगून त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली.