बेळोंडगीतील आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यां अभावी 10 वर्षापासून बिनकामाचे
बेळोंडगी,वार्ताहर : येथे बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 10 वर्षापासून आरोग्य विभागाच्या भोगळ कारभारामुळे बिनकामाचे बनले आहे.गेल्या अनेक वर्षापासून उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येथे कर्मचारी नेमलेला नाही.त्यामुळे केंद्र कुलूपबंद आहे.
उपकेंद्राला नेमून दिलेले कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकारी याकडे फिरकत नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
गावात अनेक आजारांचे थैमान आहे,दुर्गंधी मुळे डासाची उत्पती वाढली आहे. पाणी अखेरीला आल्याने अशुध्द पाणी पुरवठा होत आहे. त्याशिवाय सामान्य आजारावर खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. देशाचे पंतप्रधान आरोग्य सुविद्या साठी आग्रही असताना बेळोंडगीतील उपकेंद्र त्याला अपवाद ठरत आहे.नवे बांधकाम झाल्यानंतर काही दिवस येथे कर्मचारी येत होते.केंद्र उघडले जायाचे मात्र आता ते कायमस्वरूपी बंद आहे.
येथे कर्मचारी तर सोडाच पण गेल्या अनेक वर्षापासून केंद्र कुलूपबंद असल्याचे ग्रामस्थ सांगतात.निसर्गाने दुर्लक्षित ठेवलेल्या बेळोंडगी तील ग्रामस्थांना आरोग्य सुविद्येतही यंत्रणेने मागास ठेवले आहे.येथील उपकेंद्राचे तातडीने उद्घाटन करून कायमस्वरूपी कर्मचारी नेमावेत असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
बेळोंडगी ता.जत येथील आरोग्य उपकेंद्र कर्मचारी नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून कुलूपबंद आहे





