जत | शॉक लागलेल्या कोमातील मुलीला डॉ.शरद पवार यांनी दिले जिवनदान | www.sankettimes.com

0
5

जतच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश 

जत,प्रतिनिधी : जतच्या वैद्यकीय क्षेत्राला अनेक डॉक्टरांनी नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यात आता जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.शरद पवार यांची भर पडली आहे.जत शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून डॉ.पवार यांनी वेगळा ठसा उमटविला अाहे.त्यांच्या हॉस्पिटल मध्ये रुग्ण बरा होणार हे जवळपास निश्चित असते.नुकतेच विजेचा शॉक लागून कोमात गेलेल्या एका मुलींला अत्यंत चिंताजनक स्थितीतून बाहेर काढत तिला जिवनदान देण्यात डॉ.शरद पवार यांनी आपला दांडगा अनुभव,तंत्रज्ञान वापरून यश मिळविले आहे.जत शहरालगतच्या कडीमळ्यातील महाविद्यालयीन तरूणी सारिका बसाप्पा माळी(वय-18) हिला वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांना पाणी भराताना स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागला होता. सारिका जागेवरचं कोमात गेली होती.

अंत्यत चिंताजनक स्थितीत सारिकाला नातेवाईकांनी डॉ.पवार यांच्या जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.सारिकाच्या डाव्या हाताला गंभीर शॉक लागला होता.ह्रदयापर्यत दुखापत झाली होती.

 परिस्थिती बघून डॉ.पवार यांनी अत्याधुनिकता वापरत तातडीने उपचार सुरू केले होते.चौवीस तास अतिदक्षता विभागात सारिकावर अथक उपचार करून तिला वाचविले आहे.मोठ्या शहरात असतील अशा अत्याधुनिक यंत्रणा व प्रशिक्षित स्टाप डॉ.पवार व त्यांच्या पत्नी डॉ.प्रिया पवार यांच्या टिमने अशक्य ते शक्य करून दाखविले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील वेगळा मापदंड निर्माण केलेल्या डॉ.पवार यांचे यश जतच्या वैद्यकीय क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेहून ठेवणारे आहे.सांगली,मिरज,विजापूर सारखे उपचार डॉ.पवार यांच्यामुळे जतेत उपलब्धं झाले आहेत.जतच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ.पवार यांचे हॉस्पिटल वरदान ठरत आहे.सुपर स्पेशालिटी सुविद्या येथे उपलब्धं आहेत.कोणत्याही आजारावर तातडीने उपचार येथे केले जातात.


जतच्या नागरिकांना वैद्यकीय सर्वोत्तम सुविद्या आम्ही जतेत उपलब्धं करून दिल्या आहेत. सारिकाला विजेच्या शॉकमुळे ह्रदयापर्यत आघात झाला होता.अत्यंत चिंताजनक स्थितीत तिच्यावर आम्ही उपचार केले. सारिका आता पुर्णत:बरी झाली आहे. या अत्याधुनिक उपचार पध्दतीमुळे तातडीने उपचार करून तिला वाचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोतडॉ.शरद पवार,संचालक जत

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जत

फोटो 

जत येथील अत्याधुनिक उपचार पध्दतीमुळे वाचलेली सारिका माळी समवेत देवदुत ठरलेले डॉ.शरद पवार,व डॉ.प्रिया पवार 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here