जत | परशुराम मोरेच्या पुढाकारांने गोलार गल्लीचा पाणी प्रश्न सुटला | www.sankettimes.com

0
10

जत ,प्रतिनिधी : सामाजिक कामाची तळमळ असेलतर पदाची गरज नसते, जे जनतेसाठी काम करतात.ते सदैव सक्रीय लोकसेवक असतात.असेच एक पालिकेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे हे एक व्यक्तिमहत्व होत.

जनहिताची तळमळ त्यांच्या कार्यातून सतत स्पष्ट होत आहे. जत शहरात तब्बल पंच्चाहत्तर दिवस स्वच्छता मोहिम राबवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.माणूसकीची भिंत असे अनेक उपक्रम मोरे यांनी राबिलेले आहेत. अनावश्यक वाढदिवसाचा खर्च वाचवून अनेक उपक्रम राबविण्यात ते सतत अग्रेसर असतात. नुकतीच त्यांनी शहरातील गोलार गल्लीतील तीव्र पाणी टंचाईतून सुटका करताना स्व:खर्चातून नळ जोडणी करत पाणी पुरवठा सुरू केला आहे.परिसरातील काही नागरिकांनी मोरे यांची भेट घेऊन पाणी येत नसल्याचे व पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे सांगितले होते.त्यावर तातडीने मोरे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून नागरिकांचे पाणी कनेक्शनची 5 हाजार रक्कम स्व:ता भरून पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यापुर्वी सत्ताधारी नगरसेवकांच्या कडे याबाबतचा माहिती देऊन त्यांनी लक्ष दिले नव्हते पंरतू मोरे यांनी तातडीने आमचा प्रश्न सोडविल्याचे नागरिकांनी सांगितले.

समाजहितासाठी कायम कठिबंध्द जत शहरातील नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मी सत्ता आसुदे किंवा नसूदे मी कायम कठीबंध्द आहे.लोकहिताची तळमळ माझ्या कुंटूबापासून कायम आहे.ती यापुढेही कायम असेल.– परशुराम मोरे

जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी स्व:खर्चातून नळजोडणी करून गोलार गल्लीतील पाणी प्रश्न सोडविला.

अटैचमेंट क्षेत्र

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here