जतेत उष्माघातने वयोवृध्द महिलेचा मुत्यू
जत, प्रतिनिधी :मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील वृध्दा चंद्राबाई बाबासाहेब दुधाळ (वय- 70) यांचा जत बसस्थानकात अकस्मिक मृत्यू झाला.
उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
चंद्राबाई आपल्या पाहुण्याकडे आल्या होत्या. जत बसस्थानकात स्वच्छता गृहात गेल्यानंतर चक्कर येऊन पडल्या त्यातच त्यांचा मृत्यु झाला. जत तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून उष्माघाताने त्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.





