माडग्याळ, वार्ताहर : कुलाळवाडी (ता.जत)येथे पानी फौंडेशनची सुरूवात धमाक्यात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विद्यार्थी तुफानसेनेने आपली बक्षिस रक्कम पानी फांऊडेशन साठी देऊन केला डबल धमाका सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकजागृती करतानाच आपल्याला मिळालेली बक्षिसाची रक्कम 18 हाजार रुपये पाणलोट कामासाठी देऊन विद्यार्थ्यांनी आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रमात अंगणवाडी ते इ. 8 वीतील विद्यार्थ्यांनी पाणलोट उपचारांचे महत्त्व पटवून देणाऱ्या सहा विविध विनोदी नाटीका सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याच प्रमाणे विविध प्रकारचा सत्तावीस मराठी व हिंदी गीतांवर धमाल नृत्य सादर करून सर्वांचे मानोरंजन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन पं .स. जतचे सदस्य विष्णू चव्हाण यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाले.कार्यक्रमास पानी फांउडेशन जतचे तालुका समन्वयक गजानन पिंपळे व त्यांचे सहकारी,आसंगी (जत) चे सरपंच श्रीमंत पाटील व विठ्ठल गायकवाड , कुलाळ्वाडी ग्रा.पं.सदस्य , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, कुलाळवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी कुलाळवाडीतील तरुणांनी उत्तमरित्या पार पाडली.
माडग्याळ : कुलाळवाडी ता.जत येथे पाणी फौंडेशनच्या कामास दिमाखात सुरूवात करण्यात आली.





