डफळापूर | जूनी इमारत बनली हागनदारी | www.sankettimes.com

0
0

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर (ता.जत) येथील जनावराच्या दवाखान्याची जूनी इमारत हागनदारी बनली आहे. त्यामुळे लगत असणाऱ्या अंगणवाडी,तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय तसेच लगतच्या घरात परिसरात दुर्गंधी पसरली आहे.अगदी जवळच 

असलेल्या अंगणवाडीतील चिमुकल्याचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने ही जूनी इमारत पाडून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे.

डफळापूर परिसरातील जनावराचा दवाखाना या जून्या इमारतीतून चालत होता.दवाखान्याला नवी इमारत मिळाल्याने सध्या नविन इमारतीतून दवाखान्याचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे जूनी इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीचे छत कोसळले आहे.दरवाजे,खिडक्या,व भिंती मोडकळीस आल्या आहेत. त्यांचा फायदा घेत काही नागरिकांनी या इमारतीला अघोषित स्वच्छता गृह बनविले आहे.त्यांची दुर्गंधी परिसरात पसरली आहे.डफळापूर ग्रामपंचायत स्वच्छ भारत अभियानात 90 टक्के टार्गेट पुर्ण केले आहे. त्याच ग्रामपंचायतीच्या मागे असणाऱ्या या जुन्या इमारतीला काही नागरिकांनी हागनदारी बनवली आहे.

डफळापूर येथील जनावराच्या या जून्या इमारतीत हागनदारी बनली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here