जत,प्रतिनिधी : जत शहरातील राहूल शंकरराव मोरे (रा.मोरे कॉलनी) यांच्या हवलदार वस्ती येथील ऊसाच्या शेतास विजेची ठिनगीमुळे लागलेल्या आगीत दीड लाख रूपयाचे नुकसान झाले.याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.घटना शनिवारी घडली.
आगीत ऊसाचे पिक, जैन कंपनीचे ठिंबक,पञ्याचे शेड,एचटीपी,किसान कंपनीचे इंजिन,जैन ठिंबकच्या तीन बंडल पाईप असे दीड लाख रूपयाचे नुकसान झाले.







