जत,प्रतिनिधी: येथील सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी व उमाजीराव सनमडीकर मेडिकल फौंडेशन,ज आयोजित सिध्दार्थ फेस्टिव्हल 2018 ता 2 व 3 फेंब्रुवारी दरम्यान सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.
या फेस्टिव्हल मध्य राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृति-व्याख्यानमाला,व विद्यार्थ्याच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात शुक्रवार ता.2 फेंब्रुवारीला राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृति-व्याख्यानमालेत इतिहास संशोधक शिवश्री अमरजीत पाटील यांचे बहुजन आणि शिक्षण या विषयावर व्याख्यान,या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार उमाजीराव सनमडीकर उपस्थित असतील. शनिवार ता.3 फेंब्रुवारी संस्था अंतर्गत विविध शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थींनीचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार उमाजीराव सनमडीकर उपस्थित राहणार आहेत.यात सिध्दार्थ पब्लिक स्कूल ,सिध्दार्थ पॉलिटेक्निक,कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन,राजर्षि शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा,संत गाडगेबाबा माध्य.उच्च माध्य.आश्रमशाळा,जत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा.आश्रमशाळा, माडग्याळ, महात्मा जोतिराव फुले प्रा. आश्रमशाळा, सनमडी या शाळेचे विद्यार्थीं सहभागी असतील. या फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने डॉ. कैलास सनमडीकर यांनी केले आहे.