हनुमान विद्यामंदिर हायस्कूलच़्या इमारतीचे भूमिपुजन
संख, वार्ताहर : अंकलगी ता. जत येथील मल्लिकार्जून विद्यासर्वधक संस्थेच्या जत हनुमान विद्यामंदिर हायस्कूलच़्या इमारतीचा भूमिपुजन समारंभ खा. संजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार विलासराव जगताप, भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी, कृषी सभापती तम्माणगौंडा रवी पाटील,माजी सभापती बसवराज पाटील, आर. के. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. जत पुर्व भागातील अंकलगी साऱख्या छोट्या गावात शैक्षणाची सोय करणारे जय हनुमान विद्यामंदिर व हायस्कूलची नवी व प्रशस्त इमारत आकारास येणार आहे. परिसरातील शेकडो मुलांना यामुळे शिक्षणाची सोय होणार आहे.
यावेळी बोलताना खा. संजय पाटील म्हणाले,अंकलगी साऱख्या गावात शैक्षणिक दर्जा वाढावा. जत सारख्या दुष्काळी भागातील मुलेही अधिकारी बनतील असे शिक्षण येथे मिळाले पाहिजे. अशी शाळा बनवा.
संख : अंकलगी ता. जत येथील श्री. हनुमान विद्यामंदिर व हायस्कूलच्या इमारतीचे भूमिपुजन करताना खा. संजय पाटील,आ. विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी, तम्माणगौंडा रवीपाटील आदि





