लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण भारताचे नवनिर्माण करणाऱ्या शिक्षक

0
3

लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

भारताचे नवनिर्माण करणाऱ्या शिक्षक 

जत,प्रतिनिधी : लायन्स क्लबचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहत संपन्न झाला. सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लबच्या वतीने लायन्स क्लबच्या “आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण रविवारी आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले.यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल वासुदेव कलगटगी,रिजन चेअरमन प्रा. एन.ए.एनामदार,डॉ. रविंद्र आरळी (प्रांतीय सभापती),ला. रांजेद्र आरळी (झोन चेअरमन)आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रांरभी आमदार विलासराव जगताप यांनी कार्यक्रमाचे उध्दाटन केले.तालुक्यातील सुभाष सदाशिव शिंदे(जत हायस्कूल,जत),दिलिप मारोती वाघमारे(प्राथमिक शाळा बाबरवस्ती,पांडोझरी),राजू तुकाराम कोळी(रामराव विद्यामंदिर,प्राथमिक शाळा),शरण्णाप्पा यल्लाप्पा जावीर(जि.प. कन्नड शाळा,खोजानवाडी),निर्मला वंसतराव मोरे(राजे रामराव महाविद्यालय,जत) अनुराधा संकपाळ (योग शिक्षिका)

हे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार 2017चे मानकरी ठरले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्काराची ट्रापी, सन्मानचिन्ह,शाल शिफळ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, नवी पिठी निर्माण करणाऱ्या शिक्षकाना हे पुरस्कार उर्जा ठरतील, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जत लायन्स क्लबचे कार्य कोतुकास्पद आहे. यापुढे जात त्यांनी जनतेची नाळ ओळखूंन काम करावे.

डॉ. रविंद्र आरळी म्हणाले, लायन्स क्लब हा मुळातच समाजसेवेला वाहून घेतलेली संस्था आहे. पुरस्कार शिवाय सामाजिक उपक्रम आम्ही राबविले आहे. आरोग्य शिबिरे,पुरग्रस्ताना मदत,गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे विशेष उपक्रमाचे कौतुक झाले आहे. यापुढेही आमचे सामाजिक उपक्रम जनतेच्या हितासाठी असतील,लायन्स क्लब यापुढे जत तालुक्यातील जनतेत नवनिर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल.लायन्स क्लब जत व उमदीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जत: लायन्स क्लबचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळ्यात झाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here