बिराड निघाली ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने परजिल्ह्यात रवाना :पुर्व भागातील अनेक गावे,बाजारपेठा ओस

0
1

बिराड निघाली 

ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने परजिल्ह्यात रवाना :पुर्व भागातील अनेक गावे,बाजारपेठा ओस

माडग्याळ,वार्ताहर :जत तालुक्यासह पुर्व पट्टय़ातील शेतमजूर मोठय़ा संख्येने परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. यामुळे परिसरातील लहान गावांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. बाजारपेठेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुकादम आपापल्या मजुरांना परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी रवाना करीत आहेत. प्रत्येक गावातून ऊसतोडणी मजूर टँक्टर,ट्रकमधून रवाना होत आहेत.पर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होत असल्याने मुकादम मजूर घेऊन जात आहेत. प्रत्येक मुकादमाकडे 50 ते 200 मजूर (कोयते) असतात. मजुरांना पाच-सहा महिने रोजगार मिळत असल्याने मजुरांचा ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जाण्याकडे ओढा असतो. पाच-सहा महिन्यात खर्च वजा जाता 80 ते एक लाख रुपये कमावत असल्याचे एका मजुराने सांगितले. मजुरांसाठी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते. औषधोपचाराचा खर्च कारखान्यांकडून मोफत केला जातो. ऊसतोडणी वेळी हिरवा चारा असतो, तो चारा विक्री करून मजूर आपला घरखर्च भागवितात. जेवढी ऊसतोड झाली त्याप्रमाणे मुकादमाकडून ऊसतोड कामगारांना रक्कम वाटप केली जाते. मुकादम आणलेल्या मजुरांची देखरेख ठेवण्याचे काम करतो. तसेच कारखान्याच्या नियोजनाप्रमाणे ऊसतोड केली जाते. दरम्यान, ऊसतोडणीसाठी मजूर मोठय़ा प्रमाणात 

कोल्हापूर,सातारा,सोलापुर,उस्मानाबांद,व लगतच्या कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यात स्थलांतरित होत असल्याने शेतकर्‍यांना या काळात मजुरांची टंचाई जाणवते. शेतकर्‍यांना वेळेवर काम करून घेण्यासाठी इतर मजुरांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. तसेच मोठय़ा प्रमाणावर मजूर स्थलांतरित होत असल्याने बाजारपेठेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळतो.दरम्यान, एका मजुराला दरवर्षी परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होण्यामागील कारण विचारले असता, त्याने सांगितले की, शेतीची सर्व कामे व पेरणीही ट्रॅक्टरद्वारे होऊ लागल्याने हाताला थोडेच दिवस काम असते. त्यात पैसाही हवा तसा मिळत नाही. ऊसतोडणीत 5 ते 6 महिने सलग काम असते व पैसाही जास्त मिळतो. म्हणूनच मजूर तिकडे जातात.

चौकट 

या वर्षी जत तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. शिवाय संखसह परिसरातील अनेक छोटे मोठे तलावे भरल्याने अनेक ऊस तोड मंजूराची कुंटुबे शेती करण्यात गुंतल्याने काही प्रमाणात मंजूराचे ऊसतोडीस जाणारे प्रमाण कमी झाले आहे. गत वर्षी दुष्काळाने मोठ्या प्रमाणात कुंटुबीयासह मजूर ऊसतोडीस गेले होते. काही गावेच ओस पडली होती. यावेळी मात्र त्यात घट झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here