जत पुर्व भागातील 42 गावासाठी लवकरचं सिंचन योजना खा. संजय पाटील ; जतच्या विकासास गती आणू : तालुक्यातील 36 संरपच व सदस्याचा सत्कार

0
6

जत पुर्व भागातील 42 गावासाठी लवकरचं सिंचन योजना 

खा. संजय पाटील ; जतच्या विकासास गती आणू :

 तालुक्यातील 36 संरपच व सदस्याचा सत्कार 

माडग्याळ,वार्ताहर : जत पुर्व भागातील 42 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यासंबंधी कर्नाटक सरकारशी बोलणी झाली असून लवकरच यावर तोडगा निघणार आहे.पुढच्या काही महिन्यात योजनेच्या कमास सुरू होईल. भाजप सरकारच्या विकास धोरणामुळे जत तालुक्यातील सुमारे 36 ग्रामपंचायतीत भाजप समर्थकाच्या ताब्यात आला आहे. हे सरकारच्या कामाची पोचपावती आहे. भाजपच राज्यात क्र. 1 वर आहे. असे प्रतिपादन खा. संजय पाटील यांनी केले. ते जाड्डरबोबलाद येथे लोकनियुक्त संरपच व सदस्याच्या सत्कार समारंभ प्रंसगी बोलत होते.त तालुक्यात झालेल्या 81 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या 36 संरपच व सदस्याच्या सत्कार करण्यात आला.खा.पाटील पुढे म्हणाले कि, जिल्हा परिषद कडून मिळणारी निधी थेट ग्रामपंचायतीना मिळणार आहे. त्यासाठी मिळणारा निधी, शासनाच्या विविध योजनासंबधी सरपंचाना माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी येणाऱ्या थोड्या दिवसात जत येथे सरपंचासाठी कार्यशाळा करणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाकडून लढवण्यात आलेली नाही. यात निवडून आलेले उमेदवार जनतेसमोर त्यांनी केलेले काम व पुढे करणार असलेले जाहीरनामे जनतेसमोर ठेऊन निवडून आलेले आहेत. त्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे. कार्यक्रमास उपस्थित 36 गावाचे सरपंच किंवा सदस्य हे भाजपचे आहेत. यापुढेही जाऊन जिल्ह्याचा खासदार या नात्याने आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंच असो वा सदस्य त्यांची कामे केली जातील असे खा. पाटील यांनी शेवटी सांगितले.आमदार विलासराव जगताप यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे असे म्हणणाऱ्याचां समाचार घेताना खा.पाटील म्हणाले,बिट हवालदारांनी पोलीस फौजदाराला शहाणपन शिकवू नयेे असा टोला कॉग्रेस नेत्यांना खा.पाटील यांनी लगावला.आमदार विलासराव जगताप म्हणाले की, विरोधकांनी खरे ते बोलावे,36 गावाचे सरपंच हे भाजपचे आहेत. त्यांनी खरे तेच बोलावे. खोटी आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल करू नये. निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी गाव कसे सुधारेल याकडे लक्ष द्यावे. सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य दिले जाईल. गावाच्या हिताची कामे घेऊन आल्यास सगळ्यांची कामे केली जातील. यामध्ये पक्षाचा कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. जनतेने आपल्याला त्यांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. प्रथम त्यांची कामे करा असा सल्ला त्यांनी नूतन सरपंचाना दिला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी नवनिर्वाचित नूतन सरपंचाचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस सुभेच्छा दिल्या. गावाचा सरपंच म्हणून काम करताना पारदर्शी कारभार करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. शासनाच्या विविध योजना, वित्त आयोगाच्या निधी कसा खर्च करावा व कसे काम करावे यासंबधी लवकरच जत येथे कार्यशाळा तालुक्यात घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मण्णगौडा रविपाटील यांनी उपस्थित नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे आभार मानले. जत तालुक्यात भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सभापती तम्मण्णगौडा रविपाटील यांनी जाडरबोबलाद येथे आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाबद्दल खा. संजय पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.सरपंच व ग्रामपंचायत सत्कार समारंभास 36 गावाचे सरपंच तसेच सदस्य, प्रदेश कार्यकारणी डॉ. रविंद्र आरळी, शिवाजीराव ताड, अप्पासो नामद,जि.प. सदस्य सरदार पाटील,सदस्या स्नेहलता जाधव, प.स. सदस्य मनोज जगताप, विष्णू चव्हाण, सदस्या श्रीदेवी जावीर, उमेश सांवत,भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी आदि मान्यवर उपस्थित होते. आभार माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वराप्पा रविपाटील यांनी मानले.

माडग्याळ : जाड्डरबोबलाद (ता. जत)भाजपच्या लोकनियुक्त 36 संरपच व सदस्याचा सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here