बनावट सातबारा जोडून जमिन व्यवहार प्रकरणी तलाठ्यासब तिघांवर गुन्हा दाखल

0
11

बनावट सातबारा जोडून जमिन व्यवहार प्रकरणी तलाठ्यासब तिघांवर गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी :अंकले ता.जत येथील जमिनीचा बनावट सातबारा,खातेउतारा जोडून जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे. अंकले व बागेवाडीचे गावकामगार तलाठी ए.ए. हांगे व अन्य दोघावर जत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे.

हवेली क्र.27 जि. पुणे येथील सह  दुय्यम निंबधक व जतचे तत्कालीन दुय्यम निंबधक धनंजय जोशी यांनी जत पोलिसात लेखी फिर्याद दिली आहे.बोगस जमिन खरेदी प्रकरणी जमिन विक्री करणारे राजेश गोरख चंदनशिवे, महेश गोरख चंदनशिवे (सध्या रा. देवनार,मुंबई)व बनावट सातबारा देणारे गावकामगार तलाठी हांके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे तक्रारीत म्हटले आहे. जमिनीची खरेदी मुळ अंकले़चे व आता सोलापुरचे जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक यांनी लगत असणाऱ्या चंदनशिवे यांची जमिन खरेदी केली आहे. जत दुय्यम निंबधक कार्यालयात 31 जुलै 2014रोजी क्रं.2969/2014हा दस्त नोंद करण्यात आला आहे. अंकले ता. जत येथील गट क्र.68 मधील 85 आर जमिनीची दस्तानुसार खरेदी-विक्री करण्यात आली आहे. सदरची जमिन नाईक यांनी दीड लाख रुपयाला गोरख व महेश चंदनशिवे यांच्या कडून खरेदी केली आहे.

याप्रकरणी अंकले येथील संभाजी चंदनशिवे यांनी बनावट सातबारा जोडून व्यवहार केल्याची तक्रार केली होती . महेश,गोरख यांनी गावकामगार तलाठी हांगे यांच्याशी संगनमत करून जमिनीचा बोगस उतरा तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारी वरून प्रांताधिकारी यांनी चौकशी केली असता सातबारा बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोगस उताऱ्याद्वारे खरेदी दस्त केल्याप्रकरणी नोंदणी अधिनियमन 1908 चे कलम 88 नुसार जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. मागील दहा महिन्यापासून जत पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे तक्रारदार संभाजी चंदनशिवे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे धाव घेतली होती. जिल्हा पोलिस प्रमुखांनी पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. राजेश चंदनशिवे यांला ताब्यात घेतले आहे. दरम्यान दोषी तलाठी हांगे यांची यापुर्वी दोषी धरत त्यांनी एक वेतन वाढ रोकली आहे. ते सध्या फरारी झाले आहेत. मुख्य खरेदीदार नाईक यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. मात्र कारवाईत त्यांना वगळले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here