संख अप्पर तहसिल कार्यालयाचे दिपक शिंदे पहिले तहसिलदार लवकरच कार्यालय सुरू होणार ; शासनाने नियुक्तीचे आदेश काढले

0
6

संख अप्पर तहसिल कार्यालयाचे दिपक शिंदे पहिले तहसिलदार

लवकरच कार्यालय सुरू होणार ;  शासनाने नियुक्तीचे आदेश काढले

जत,प्रतिनिधी : जतचा महसूली भार कमी करण्यासाठी शासनाने  संख येथे मंजूर केलेल्या अप्पर तहसिल कार्यालयासाठी शिराळ्याचे तहसिलदार दिपक शिंदे यांची संख तहसिलदार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे संख अप्पर तहसिल कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. संख येथे लवकरच कार्यालय सुरू होणार आहे.

जत तालुक्यातील नागरिकांच्या मागणीवरून जतचे विभाजन सध्या शक्य नसल्याने महसूल विभागाचा भार कमी करण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी संख येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर केले आहे. संखच्या कार्यालयासाठी उमदी व माडग्याळचा विरोध आहे. त्याला विरोध करत माडग्याळ व उमदीमध्ये अंदोलन झाले होते. दरम्यान शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार उमदी व माडग्याळचा प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला आहे. त्याअगोदर संखचे अप्पर तहसिल कार्यालय सुरू होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या कार्यालयासाठी तहसिलदार म्हणून दिपक शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.महसूल विभागाचे सह सचिव मा.आ.गुट्टे यांनी नियुक्तीचा आदेश दिला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here