निकालानंतर पाच गावात हाणामारी जत तालुका: 4 जखमी,वाहनाची तोडफोड : 15 जणावर गुन्हा दाखल

0
4

निकालानंतर पाच गावात हाणामारी 

 जत तालुका: 4 जखमी,वाहनाची तोडफोड : 15 जणावर गुन्हा दाखल


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत पाच गावात वादावादीचे प्रकार घडले. निकालनंतर जतमध्ये पांडोझरी येथील भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात तुफान दगडफेक झाली.त्यात चौघे जखमी झाले. लोहगाव, अचकनहळ्ळी, बसर्गी व सिंदूर येथे वादावादी,हाणामारी, दगडफेक व विटंबनेचा प्रकार घडला.

शांततेत झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणीनंतर गालबोट लागले.आमदार जगताप यांच्या पेट्रोल पंपावर पांडोझरीतील भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडले.त्यात तुफान दगडफेक, काठीने मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेले आकाश रामा चव्हाण (रा. पांडोझरी) याने जत पोलिसात तक्रार दिली आहे. गावात राहू देणार नाही, अशा दमकी देत मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 13 जणाविरोध चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. मारहाणीत पवन चव्हाण, दिपक चव्हाण, शंकर पवार, बबन चव्हाण व फिर्यादी जखमी झाले आहेत. लोहगावात सोमवारी पोष्टर फाडल्याने तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून बाबासाहेब पाटील व अतुल चव्हाण यांना अटक केली.माजी संरपच सिध्देश्वर तोरणे यांनी तक्रार दिली आहे. अचकनहळ्ळी सोमवारी रात्री भाजप व कॉग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला.तालुक्यातील बसर्गी व सिंदूर येथेही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात मारमारीचे प्रकार घडले.गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिस उपअधिक्षक नागनाथ वाकुर्डे, पोलिस निरिक्षक राजु तासिलदार यांनी पोलिस बंदोबस्त तैनात करून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here