बालगांव सत्तेतून जनतेचे प्रश्न सोडविणार :
संगिता बगली
उमदी,वार्ताहर : बालगांव (ता. जत) येथे भाजपा प्रणित श्री.अल्लमप्रभु व अमोगसिध्द ग्रामविकास पॅनल च्या सरपंच पदी सामान्य कुटुंबातील निवडून आलेल्या उमेदवार सौ.संगीता रमेश बगली ह्या 118 मतानी विजयी झाल्या आहेत. शारदा सायबाण्णा गुरव ,गौराबाई मल्लाप्पा अरसगोंड ,मल्लाम्मा विठ्ठल कोळी ,पराप्पा बसाप्पा माळी या चार भाजपाच्या सदस्याना देखील घवघवीत यश मिळाले आहे.त्यामुळे बालगांव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवित सत्तातंर केले आहे.
पॅनल प्रमुख सायबाण्णा मुचंडी (पैलवान) म्हणाले की,गेल्या अनेक वर्षा पासून सत्ताधारी पक्षाकडून बालगांव गावाचा अपेक्षित विकास न झाल्याने यावेळी भाजपा पुरस्कृत सौ. संगीता बगली यांना मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केले आहेत. दिल्ली पासून गल्ली पर्यंत भाजपचे सत्ता असल्याने विकास नक्की होणार आहे. त्यामुळे गावाचा सर्वागीण विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. प्रामुख्याने स्वच्छ पाणी,गटारी,मजबूत रस्ते,शौचालये,गाळे,ग्रामपंचा
बालगांव ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा आ. विलासराव जगताप यांनी सत्कार केला.





