फेसबुक वर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या युवकाच 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी
जत,प्रतिनिधी : येळवी ता. जत येथील एका युवकांनी फेसबुक द्वारे ग्रामपंचायत निवडणूकीत पाश्वभुमीवर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवर गुन्हा दाखल करण्यात आला.त्यात त्याला न्यायालयात हजर केले असता 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक माहिती अशी,विक्रांत बाळू रुपनर(वय-22) यांने फेसबुक द्वारे आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुशंगाने दहशत निर्माण व्हावी,सामाजिक शांतता व सुरक्षितता भंग व्हावी या आशयाची पोस्ट टाकून कायदा सुव्यवस्था बिघविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांमुळे त्यांच्यावर जत पोलिस ठाण्यात सायबर गुन्हाखाली कलम 151/3 नुसार फौजदारी प्रक्रिया सहिंता प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याला गुरूवारी जत न्यायालयात हजर केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शिवाय ता. 8 मार्चला असेच गैरकीयद्याची मंडळी जमवून केलेला गुन्हा व भविष्यात ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांच्याकडून गैर कृत्य होण्याची शक्यता होती.कायदा सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून डिवायएसपी नागनाथ वाकुर्डे,पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.