नरेंद्र चुग, विजय माने, जिल्हा वन अधिकारी रमाकांत कुलकर्णी,जलसाक्षरता केंद्र अंकुश नारायणकर, जलबिरादरी जिल्हा समन्वयक सागर पाटील हे त्यांच्या सोबत उपस्थित होते.
डफळापूर, खलाटी,मिरवाड,कडणूर या गावात जलबिरादरीच्या वतीने माथा ते पायथा अशी पाणी मुरविण्यासाठी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉ.राणा यांच्या टिमने डफळापूर येथे बैठक घेतली होती.तत्पुर्वी डॉ.राणा यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी या गावाशिवाय डफळापूर परिसरातील अन्य गावातही जलबिरादरीकडून अशी कामे व्हावीत,अशी विंनती डॉ.राणा यांच्याकडे दिग्विजय चव्हाण यांनी केली.
चार गावासह अन्य ठिकाणी शक्य होतील तेथे पाणलोटची काम करून येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरविण्याचा प्रयत्न करू असे डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी सांगितले.
डफळापूर : जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.