संख प्रकल्पाच्या कँनॉलचे कॉक्रीटीकरण केल्याशिवाय पाणी सोडू नये,स्वा.शेतकरी संघटनेचे निवेदन

0
जत,संकेत टाइम्स : संख‌ मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजव्या कँनॉलचे १०० टक्के कॉक्रीटीकरण झाल्याशिवाय पाणी सोडू नये अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, संख प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कँनॉलमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या दोन्ही कँनॉल नादुरूस्त आहेत.अनेक ठिकाणी कँनॉलला लिकेज असल्याने लगतच्या शेतीत पाणी पाझरत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होते आहे.कोणेतही दुरूस्तीचे काम न करता पाटबंधारे विभाकाकडून असे पाणी सोडण्याचे नियोजन लगतच्या शेतकऱ्यांच्या नुकसान करणारे आहे.त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता पाटबंधारे विभागाने प्रांरभी दोन्ही कँनॉलमध्ये कॉक्रीटीकरण केल्याशिवाय पाणी सोडण्यास आमचा विरोध आहे.त्याशिवाय पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.