जत : जत तालुक्यातील जत,उमदी पोलीस ठाणे हद्दीतीत,स्थानिक गुन्हे विभाग,विशेष पथके यांचे हप्ते सैट झाले असून बेफाम मटका,ऑनलाइन लॉटरी, जुगार,दारूसह सर्व अवैध धंदे सुरू झाले आहेत.हप्ते न देणाऱ्या अड्ड्यावर कारवाईचे नाटक केले जात आहे. पोलीस ठाण्याला सव्वा लाख हप्ता द्या बिनधास्त मटका सुरू करा असा फतवा पोलीसांनी काढल्याची चर्चा सुरू आहे.
उमदी,माडग्याळ, संख,कोतेंबोबलाद, गिरगावसह परिसरातील सर्वच गावात छुपे सुरू असलेले अवैध धंदे हप्तेखोरीने उघड्यावर सुरू झाले आहेत.पोलीस ठाण्याचे चार पोलीस कर्मचारी फक्त हप्ते गोळा करण्याच्या कामगिरीवर असल्याची चर्चा आहे.त्याशिवाय विशेष पथकाचे,स्थानिक बिट,पोलीस पाटील यांचेही हप्ते फिक्स झाल्याने अवैध धंद्याचा बाजार तुफान सुरू आहे. मटक्याच्या चिठ्ठ्या थेट रस्त्यावर बसून घेतल्या जात आहेत.चौकातील लोकवस्ती,स्टँड परिसरात तिन पानी जुगार अड्डे सुरू आहेत.बेकायदा वडाप,गांज्या,दारू अड्डे,गुटखा,वाळू तस्करी करणारे आता पोलीसाच्या सहकार्यांने व्हाईट कॉलर नेते म्हणून वावरू लागले आहेत.त्यापलिकडे जात अवैध धंद्याच्या मिळकतीतून गुंडाराज वाढले आहे.याकडे जिल्हापोलीस प्रमुखांचे पूर्णत:दुर्लक्ष सर्वकाही बिनधास्त,बेधडक सुरू आहे.भविष्यात तालुक्यातील तरूण मटका,जुगारासारख्या अवैध धंद्यामुळे बरबाद झाल्यास,घरे उधवस्त झाल्यास वावगे वाटू नये.जतेत अवैध वाहतूकीला यंत्रणेचे बंळ
जत पोलीस ठाणे हद्दीतील अवैध वाहतूकीवर नव्याने आलेले पोलिस निरिक्षकांनी सिंघम स्टाईल कारवाई करून अगदी काळ्या-पिवळ्या वडाप वाहतूकीला जबर बसवली होती.मात्र नव्याने नऊ दिवस संपल्यानंतर पुन्हा अवैध वडाप वाहतूकीसह काही धंद्यांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे.शहर वाहतूकीसाठी काही अनुभवी व वादग्रस्त कर्मचारीची नेमणूक केली आहे.त्यामुळे वसूली जोमात असल्याची चर्चा आहे.